६ हजार तरुणांनी साकारले निवडणूक आयोगाचे चिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:26 AM2019-01-26T00:26:02+5:302019-01-26T00:26:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : ९ व्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून अतिशय उत्साहाच्या वातावरणात शनिवारी जिल्हा क्रीडा संकुल ...

The Election Commission's signature of 6 thousand youths came true | ६ हजार तरुणांनी साकारले निवडणूक आयोगाचे चिन्ह

६ हजार तरुणांनी साकारले निवडणूक आयोगाचे चिन्ह

Next
ठळक मुद्दे९ वा राष्ट्रीय मतदार दिन : जिल्हाधिकाऱ्यांनी दिली शपथ

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ९ व्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून अतिशय उत्साहाच्या वातावरणात शनिवारी जिल्हा क्रीडा संकुल येथे ६ हजार तरुणांनी भारत निवडणूक आयोगाच्या चिन्हाची मानवी प्रतिकृती साकार करून कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता  येणाºया सर्व निवडणुकांमध्ये निर्भयपणे मतदान करण्याची शपथ घेतली. तसेच ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ग्राऊंड येथे ७० हजार चौरस फूट जागेवर रांगोळी काढून मतदानाविषयी जनजागृती केली.
जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, रमण आटर्स आणि महाविद्यालयीन मतदार जागृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल येथे  आयोजित राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम नवं मतदारांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी खासदार रामदास तडस,  जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, निवासी उपजिल्हाधिकारी उत्तम दिघे, उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रवीण महिरे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ. किरण धांदे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील नवीन मतदारांच्या सहकार्याने ६ हजार तरुण आणि तरुणींच्या मदतीने मानवी रांगोळी साकारण्यात आली.  जिल्हाधिकारी यांनी सर्व उपस्थितांना यावेळी मतदार दिनाची शपथ दिली. उपस्थित तरुणांमधून एक विद्यार्थी व विद्यार्थिनीला मंचावर बोलावून त्यांना ई व्ही एम वर मतदान करण्याचे प्रात्याक्षिक करून घेतले. यावेळी या नव  मतदारांनी व्ही व्ही पॅट च्या माध्यमातून केलेले मतदान योग्य व्यक्तीला मिळाले की नाही याची खात्री  सुद्धा करून घेतली. वर्धेतील दैवत बँड पथकाने केलेल्या अतिशय दमदार सादरीकरणाने  या सर्व कार्यक्रमात उत्साह निर्माण केला. मतदानाच्या दिवशी मिळालेल्या सुटीचा सुशिक्षित नागरिक मतदान न करता कसा उपयोग करतात याविषयी महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी नृत्य आणि पथनाटयाच्या माध्यमातून मतदानाविषयी जनजागृती केली. यावेळी आयोजित निबंध, रांगोळी आणि वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना आणि प्राचार्यांना   मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व सन्मानपत्र देण्यात आले. राष्ट्रीय मतदार दिन आणि लोकशाही पंधरवाडा निमित्त पोलीस ग्राऊंडवर ७० हजार चौरस फूट जागेवर रांगोळी तयार करून मतदानाचा संदेश देण्यात आला. यासाठी रमण आटर्सच्या १५० विद्यार्थ्यांनी १४ तास रांगोळी काढली.

Web Title: The Election Commission's signature of 6 thousand youths came true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.