तीन वर्षात १३ हजार ५०० कृषीपंपांना वीज जोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 11:25 PM2017-11-04T23:25:52+5:302017-11-04T23:26:02+5:30

विदर्भात कृषीपंपांचा वाढता अनुशेष पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ, मराठवाड्यात कृषीपंप उर्जिकरण कार्यक्रम हाती घेतला. त्यासाठी २०० कोटी रूपयांचे विशेष पॅकेज देऊन हा अनुशेष भरून काढण्यात येत आहे.

Electricity connection to 13 thousand 500 pumps in three years | तीन वर्षात १३ हजार ५०० कृषीपंपांना वीज जोडणी

तीन वर्षात १३ हजार ५०० कृषीपंपांना वीज जोडणी

Next
ठळक मुद्देशेतकºयांना दिलासा : कृषी उर्जीकरणासाठी १०६ कोटी खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विदर्भात कृषीपंपांचा वाढता अनुशेष पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ, मराठवाड्यात कृषीपंप उर्जिकरण कार्यक्रम हाती घेतला. त्यासाठी २०० कोटी रूपयांचे विशेष पॅकेज देऊन हा अनुशेष भरून काढण्यात येत आहे. याचाच परिपाक म्हणून एकट्या वर्धा जिल्ह्यात मागील तीन वर्षात १३ हजार ४९२ कृषीपंपांना वीज जोडणी देण्यात आली. यामुळे सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.
तीन वर्षापूर्वी दुष्काळी विदर्भ आणि मराठवाड्यात कृषीपंपांना वीज जोडणी लवकर दिली जात नव्हती. कारण कृषीपंपांना वीज देण्यासाठी लागणाºया पायाभूत सुविधाच येथे निर्माण करण्यात आल्या नव्हत्या. त्याचा फटका सिंचनाची सुविधा असतानाही केवळ वीज पुरवठा न दिल्यामुळे शेतकºयांना बसत होता. यामुळे शेतकºयांनी स्वत: सिंचन सुविधा निर्माण करूनही शेतकºयांच्या परिस्थितीत फारसा बदल दिसून येत नव्हता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सुत्रे हाती घेतल्यानंतर या विषयाकडे गांभिर्याने लक्ष दिले. त्यासाठी २०१५ मध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात वीज क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खास २०० कोटी रूपयांचे विशेष पॅकेज घोषित केले. यामुळे विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याला निधी उपलब्ध करुन देत शेतकºयांची महत्वाची समस्या निकाली निघाली.
जिल्ह्यात मार्च २०१५ अखेर पर्यंत ४ हजार ४७१ जोडण्या प्रलंबित होत्या. त्यापैकी २ हजार ५०३ जोडण्या कृषीपंपांना देण्यात आल्यात. २०१६ मध्ये कृषीपंपाच्या उर्जिकरणासाठी ३१.०६ कोटी रूपये शासनाकडून प्राप्त झाले. त्यामुळे मार्च २०१५ पर्यंत प्रलंबित असलेल्या १ हजार ९६८ आणि डिसेंबर २०१५ पर्यंत प्राप्त झालेल्या अशा ४ हजार८५० जोडण्या देण्यात आल्या. यातही मार्च २०१६ अखेर पर्यंत प्रलंबीत असलेल्या ३ हजार ६७२ जोडण्या आणि यंदा प्राप्त झालेले अर्ज याला न्याय देण्यासाठी शासनाने ७५ कोटी रूपये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी उपलब्ध करून दिलेत. त्यामुळे मार्च २०१७ पर्यंत ४हजार ६०९ वीज जोडण्या देता आल्या. मार्च २०१७ अखेर २३०० जोडण्या प्रलंबित होत्या. त्यापैकी आॅगस्ट २०१७ पर्यंत १ हजार ६३० जोडण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. उर्वरित ६७० जोडण्या आणि नवीन ११०० जोडण्या डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे, असे महावितरणचे अधीक्षक एस.टी. देशपांडे यांनी सांगितले.
सिंचन करणे झाले सोपे
मागील दहा वर्षांत केवळ ५ हजार वीज जोडण्या दिल्या होत्या. तर या तीन वर्षांत १३ हजार ४९२ कृषीपंपांना वीज जोडण्या देऊन शासनाने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकºयांना मोठा दिलासा दिला आहे. यामुळे पिकांना सिंचन करणे सहजशक्य होत असल्याचे शेतकरी सांगतात.

Web Title: Electricity connection to 13 thousand 500 pumps in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.