अकरा शाळकरी वाहनांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 09:43 PM2018-09-19T21:43:02+5:302018-09-19T21:43:17+5:30

उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने विशेष मोहीम हाती घेवून सध्या शाळकरी मुला-मुलींची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. बुधवारी राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान एकूण ११ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन वाहनांमध्ये त्रुट्या आढळून आल्या आहेत.

Eleven School Vehicle Checks | अकरा शाळकरी वाहनांची तपासणी

अकरा शाळकरी वाहनांची तपासणी

Next
ठळक मुद्देआरटीओची मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने विशेष मोहीम हाती घेवून सध्या शाळकरी मुला-मुलींची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. बुधवारी राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान एकूण ११ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन वाहनांमध्ये त्रुट्या आढळून आल्या आहेत. विद्यार्थ्यांची ने-आण करताना स्कूल बस अथवा व्हॅन चालकांनी तसेच मालकांनी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु, अनेक वाहनचालक नियमांनाच बगल देत असल्याचे निदर्शनास असल्याने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. बुधवारी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी वर्धा शहरातील काही मोजक्या चौकात विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांना अडवणू त्यांची पाहणी केली. बुधवारी सदर अधिकाऱ्यांनी एकूण ११ वाहनांची तपासणी केली. त्यापैकी दोन वाहनांमध्ये त्रुट्या आढळून आल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Eleven School Vehicle Checks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.