स्वयंरोजगारातून होणार महिलांचे सक्षमीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:35 AM2018-03-13T00:35:49+5:302018-03-13T00:35:49+5:30

महिला ही किती जागरुकतेने व प्रभाविपणे आपली भुमिका व जबाबदाऱ्या पार पाडतात हे नेहमीच अनुभवाला मिळते. आज मेळाव्याच्या निमित्ताने ते स्पष्टही होत आहे.

Empowerment of women going to be self-employed | स्वयंरोजगारातून होणार महिलांचे सक्षमीकरण

स्वयंरोजगारातून होणार महिलांचे सक्षमीकरण

Next
ठळक मुद्देपंकज भोयर : एक दिवसीय विशेष मेळावा

आॅनलाईन लोकमत
वर्धा : महिला ही किती जागरुकतेने व प्रभाविपणे आपली भुमिका व जबाबदाऱ्या पार पाडतात हे नेहमीच अनुभवाला मिळते. आज मेळाव्याच्या निमित्ताने ते स्पष्टही होत आहे. ग्रामीण भागातील महिलांनी गृहउद्योगाची कास धरली पाहिजे. स्वयंरोजगारातून महिलांचे सक्षमीकरण होऊ शकते, असे प्रतिपादन आ. डॉ. पंकज भोयर यांनी केले.
जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, वर्धा व सेलू मार्फत ग्रामीण भागातील बेरोजगार महिला व किशोरींसाठी एक दिवसीय स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन स्थानिक शिववैभव सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस तर प्रमुख अतिथी म्हणून जि. प. उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, जि. प. सभापती सोनाली कलोडे, सभापती जयश्री गफाट, सभापती निता गजाम, नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकुर, प्रकाश वाघ महाराज, डॉ. धनराज चौधरी, उज्वला सिरसाट, इमरान उलहक, अ‍ॅड. अनिता ठाकरे आदींची उपस्थिती होती.
खा. रामदास तडस म्हणाले की, किशोरवयीन मुलींसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. मुलींनी जास्तीत जास्त शिक्षण घेवून सक्षम बनले पाहिजे. तसेच मुलींनी स्पर्धा परीक्षेची तयारीही करावी. खºया अर्थाने महिला ही स्वावलंबी व सक्षम झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
सोनाली कलोडे यांनी ग्रामीण भागातील अनेक कुटुंबाची आर्थिक स्थिती ही अत्यंत हलाखीची आहे. काम करणारे दोन हात अन् त्याच्या भरवश्यावर खाणारे जास्त असल्याने तेथील बालक व महिलांना पोषक आहार सुद्धा बहूदा मिळत नाही. अश्या महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठीच या प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यातील हिंगणघाट, देवळी व आर्वी विधासभा क्षेत्रातही अशाच प्रकारे मेळावे घेण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Empowerment of women going to be self-employed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.