रिकामे प्लॉट झुडपांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:57 AM2017-10-29T00:57:05+5:302017-10-29T00:57:20+5:30

शहरातील रिकामे प्लॉट, खंडर झालेल्या इमारती तथा पालिकेची ओपन स्पेस सध्या झुडपांच्या आणि घाणीच्या विळख्यात सापडली आहे.

In empty plot buds | रिकामे प्लॉट झुडपांच्या विळख्यात

रिकामे प्लॉट झुडपांच्या विळख्यात

Next
ठळक मुद्देनगर पालिकेचे दुर्लक्ष : सरपटणाºया प्राण्यांचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील रिकामे प्लॉट, खंडर झालेल्या इमारती तथा पालिकेची ओपन स्पेस सध्या झुडपांच्या आणि घाणीच्या विळख्यात सापडली आहे. यामुळे नागरिकांना सरपटणाºया प्राण्यांचा धोका निर्माण झाला आहे. हा प्रकार शहरात कुण्या एकाच भागात नव्हे तर बºयाच ठिकाणी पाहावयास मिळत आहे. पालिका तथा स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
नगर पालिकेच्या हद्दीत येणाºया तथा लगतच्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील अनेक रिकाम्या प्लॉटवर झुडपांचे साम्राज्य दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तथा काही संस्थांना हस्तांतरित केलेल्या जागाही झुडपे आणि घाणीच्या विळख्यात अडकल्या आहेत. या प्रकारामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहरातील ठाकरे मार्केट परिसरात सांस्कृतिक भवनाचे अर्धवट बांधकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी काही मोकळी जागा आहे. सध्या या जागेवर झुडपांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी या जागेवर घोडे बांधले जात होते. यासाठी संबंधितांनी जागा जेसीबीने उखरून मोकळी केली आहे. परिणामी, झुडपांमध्ये आणखी वाढ झाली आहे. यामुळे सरपटणाºया प्राण्यांचा धोका निर्माण झाला आहे. असाच प्रकार हुतात्मा स्मारक परिसरात दिसून येत आहे. हुतात्मा स्मारक देखभाल, दुरूस्तीसाठी एका संस्थेला देण्यात आले आहे. या परिसरातील स्मारक सोडले तर उर्वरित जागेवर गवत वाढले असून झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. नालवाडी, पिपरी (मेघे), सेवाग्राम रोड, बोरगाव रोड तथा सिंदी (मेघे) परिसरातही असे अनेक रिकामे प्लॉट आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ओपन स्पेसवर घाणीचे साम्राज्य दिसून येते. परिणामी, नागरिकांना सरपटणाºया प्राण्यांचा त्रास सहन करावा लागतो. संबंधित ग्रा.पं. तथा वर्धा नगर पालिकेने याकडे लक्ष देत झुडपे काढून तथा घाण साफ करून रिकामे प्लॉट उपयोगी आणावेत. खासगी प्लॉट धारकांना नोटीस देत कार्यवाही करावी, अशी मागणी शहरातील नागरिक तथा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
घाणीच्या साम्राज्यामुळे विविध आजारांची लागण
शहरातील तथा लगतच्या ग्रामीण भागात अनेक रिकामे प्लॉट तथा रिकाम्या जागेत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे अनेक आजार डोके वर काढत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे नागरिक जेरीस आले आहेत. स्वच्छता मोहिमेचा गवगवा केला जात असला तरी शहरातीलच अनेक भागांपर्यंत ही मोहीम पोहोचलीच नसल्याचे दिसून येत आहे.
प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे
वर्धा शहर तथा लगतच्या ग्रामीण भागातील ही समस्या दूर करण्याकरिता नगर पालिका तथा संबंधित ग्रामपंचायतींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शिवाय प्लॉट धारक आणि परिसरातील नागरिकांनीही आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.
 

Web Title: In empty plot buds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.