शिक्षकांच्या समस्येबाबत संघाचे पवारांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:04 PM2017-11-18T23:04:22+5:302017-11-18T23:04:43+5:30
आॅनलाईन लोकमत
वर्धा : सध्या आॅनलाईन बदल्या चाचणी परीक्षा यासह अनेक बाबी शिक्षकांकरिता त्रासदायक ठरत आहे. या समस्यांबाबत शिक्षकांनी वेळोवेळी आंदोलने केली;पण शासनाकडून त्या आंदोलनाची आवश्यक ती दखल घेतल्या गेली नाही असा आरोप करीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने जिल्हाध्यक्ष लोमेश वºहाडे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
शिक्षकांचे म्हणणे ऐकून त्यांच्या मागण्या निकाली काढण्यासाठी सरकार वर दबाव आणण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी संघटनेच्या पदाधिकाºयांना दिले. यावेळी माजी आमदार सुरेश देशमुख, राजू तिमांडे यांच्यासह राकाँचे पदाधिकारी उपस्थित होते.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पवार यांना समस्यांची माहिती देताना १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करण्या संदर्भात शासनस्तरावर चर्चा घडवून आणावी, २७ फेब्रुवारी १७ चा शासन निर्णयात सुधारना करणे आणि शैक्षणिक सत्राच्या मध्यांतरात केलेल्या बदल्या स्थगीत करुन मे २०१८ मध्ये बदल्या करण्याबाबत सरकार सोबत चर्चा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
शिवाय शिक्षकांची आर्थिक अवहेलना करणारा वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी बाबतचा २३ आॅक्टोबर २०१७ चा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, शिक्षकाकडे असणारे अशैक्षणिक व आॅनलाईन कामाचा व्याप दिवसागणीक वाढत आहे. यामुळे शिक्षकांच्या अडचणीत वाढ झाली असून शिक्षकांना दिलासा देण्यासाठी सरकारला योग्य पाऊल उचलण्यासाठी बाध्य करण्यासाठी पवार यांनी पुढाकार घ्यावा असे यावेळी सांगण्यात आले. शास्तीच्या निकषांच्या अनुषंगाने शिक्षकांना दंड व वेतनवाढ रोखण्याचे सरकारचे प्रस्तावित धोरण मागे घेण्यास सरकारला बाध्य करावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करताना शिक्षक संघाचे हिंगणघाट विभाग प्रमुख अजय गावंडे पाटील, वसंत बोडखे, सुनील कोल्हे, राजेश वालोकर, प्रकाश किटे, सुशील गायकवाड, साहेबराव राऊत, प्रकाश किटे, हेमंत पारधी, सुरज वैद्य, प्रफुल कांबळे आदींची उपस्थिती होती.