अतिक्रमण हटविले; साहित्य रस्त्यावरच

By admin | Published: April 19, 2017 12:39 AM2017-04-19T00:39:15+5:302017-04-19T00:39:15+5:30

वर्धा-आजनसरा मार्गावर असलेल्या या गावात मुख्य रस्त्यालगत अनेकांनी अतिक्रमण केले होते.

Encroachment deleted; Literature is on the road | अतिक्रमण हटविले; साहित्य रस्त्यावरच

अतिक्रमण हटविले; साहित्य रस्त्यावरच

Next

वाहतुकीची कोंडी : सामान्य नागरिकांनाही त्रास
तळेगाव (टा.) : वर्धा-आजनसरा मार्गावर असलेल्या या गावात मुख्य रस्त्यालगत अनेकांनी अतिक्रमण केले होते. रस्ता निर्मितीकरिता बांधकाम विभागाकडून ते अतिक्रमण काढण्यात आले. या बाबीला महिना लोटत असताना मलबा हटविण्यात आला नाही. परिणामी, वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून सांडपाण्याची व्यवस्थाही मोडकळीस आल्याचे चित्र आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.
गावातील मुख्य मार्गावर काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत होती. यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रशासनाने मोजमाप करीत काहींचे अतिक्रमण हटविले. उर्वरित अतिक्रमण दोन वर्षांपासून हटविण्यात आले नव्हते. काहींनी यादीत असताना घरे व दुकाने थाटली. परिणामी, प्रशासनाने पुन्हा मोजमाप करीत महिनाभरापूर्वी उर्वरित अतिक्रमणही तीन जेसीबीच्या साह्याने हटविले. मोठी घरे व दुकाने पाडली गेली. या मोहिमेस एक महिना लोटत असताना गावातील मलबा उचलण्यात आला नाही. परिणामी, वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शिवाय सामान्यांनाही याला त्रास सहन करावा लागत आहे. याच रस्त्यालगत अनेक दुकाने असल्याने दुकानांसमोर विटा, माती, मोठे दगड जैसे थे पडून आहे.
मंगहवारी याच मार्गावर झेंडा चौकाजवळ विद्युत कंपनीचा सिमेंट खांब टँकरची धडक लागल्याने कोसळला. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. यामुळे काही तास विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. पाडलेल्या इमारतींचे अवशेष शिल्लक असल्याने वाहने जाण्यासही जागा राहिली नाही. प्रशासनाने सदर मलबा उचलावा वा नालीचे खोदकाम करावे, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)

Web Title: Encroachment deleted; Literature is on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.