अतिक्रमणधारक धडकले जिल्हाकचेरीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:44 AM2017-09-14T00:44:49+5:302017-09-14T00:45:04+5:30
तालुक्यातील २५ गावांमधील सुमारे ६ हजार कुटुंबिय गत ३० वर्षांपासून विविध ठिकाणी अतिक्रमण करून राहत आहेत. त्यांना सदर जमिनींचे स्थायी पट्टे देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी....
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तालुक्यातील २५ गावांमधील सुमारे ६ हजार कुटुंबिय गत ३० वर्षांपासून विविध ठिकाणी अतिक्रमण करून राहत आहेत. त्यांना सदर जमिनींचे स्थायी पट्टे देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी बुधवारला युवा परिवर्तन की आवाज या संघटनेच्या नेतृत्त्वात झाशी राणी चौकातून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पुढे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यावर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.
मोर्चात संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने अतिक्रमणधारक सहभागी झाले होते. अतिक्रमण करून राहणाºया कुटुंबियांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमजुर, गवंडी बांधकाम कामगार तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. हे व्यक्ती आपल्या कुटूंबाच्या निवाºयासाठी जमीन विकत घेऊ शकत नाहीत. सद्यस्थितीत त्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून संसार थाटला आहे. सदर अतिक्रमण धारकांकडून दंडाच्या स्वरूपात रक्कम संबंधीत प्रशासन घेते. परंतु, त्यांना जमिनीचे स्थायी पट्टे न देण्यात आल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येत नाही.
लोकप्रतिनिधींकडून या समस्येकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. इतकेच नव्हे तर जिल्हा प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तालुक्यातील २५ गावांमधील अतिक्रमण धारकांना राहत असलेल्या जागेचे स्थायी पट्टे देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या मागणीवर येत्या काही दिवसात सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील अतिक्रमण धारक आपल्या न्यायीक मागणीसाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
मोर्चाचे नेतृत्त्व निहाल पांडे, पलाश उमाटे, राहूल मिश्रा, गौरव वानखेडे, सुरज गायकवाड, शुभम मोकलकर, सौरभ माकोडे, अभिषेक बाळबुधे, साहिल नाडे, शुभम कुरील, ऋषभ मेंढुले, धरम शेंडे, सोनु दाते, अक्षय बाळसराफ व आदींनी केले. मोर्चात सावंगी(मेघे), पिपरी(मेघे), म्हसाळा, नालवाडी, गणेशपूर, पुलई, मांडवा, नागापुर, कुरझडी (जामठा), सेलसुरा, सिंदी(मेघे), पांढरकवडा, मांडवगड, वायगाव (नि.), पालोती, भुगाव, करंजी भोगे, सोनेगाव (स्टे.) येथील अतिक्रमणधारक सहभागी झाले होते.