मुख्याध्यापकांकडून शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 09:45 PM2019-05-03T21:45:13+5:302019-05-03T21:46:27+5:30
निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला वेळीच देणे गरजेचे आहे. परंतु, बोरगाव (मेघे) येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्यांची टिसी देण्यासाठी अडवणूकच केली जात असल्याने संतप्त पालकांसह तेथील काही सुजान लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाची चौकशी करून दोषी मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला वेळीच देणे गरजेचे आहे. परंतु, बोरगाव (मेघे) येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्यांची टिसी देण्यासाठी अडवणूकच केली जात असल्याने संतप्त पालकांसह तेथील काही सुजान लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाची चौकशी करून दोषी मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
बोरगाव (मेघे) येथील वॉर्ड क्र. ३ मध्ये जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा आहे. येथे लोमेश वऱ्हाडे हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या शाळेचा निकाल ३० एप्रिलला जाहीर झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शाळेने वेळीच शाळा सोडण्याचा दाखला देणे गरजेचे आहे. परंतु, पालकांना त्यांच्या पाल्याचा शाळा सोडल्याचा दाखलाच दिल्या जात नसल्याची तक्रार बोरगावचे विद्यमान सरपंच मोहन येरणे, नवनिर्वाचित सरपंच संतोष सेलूकर, महेश देवढे यांना प्राप्त झाली. त्यांनी पालकांची समस्या लक्षात घेता पालकांना सोबत घेऊन शाळा गाठली. अधिक विचारपूस दरम्यान एका विशिष्ट शाळेत जर विद्यार्थी पुढील शिक्षण घेणार असेल तर त्या विद्यार्थ्याच्या पाल्याला झटपट शाळा सोडल्याचा दाखला दिल्या जात होता. तर इतर पालकांना उद्या या, परवा या अशी उडवा-उडवीचीच उत्तरे दिली जात होती. हा संपूर्ण प्रकार बघितल्यावर पालकांसह सदर लोकप्रतिनिधींनी मुख्याध्यापक वऱ्हाडे यांना चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर या संपूर्ण प्रकाराची माहिती जि.प.च्या शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याला देण्यात आली. या घटनेमुळे शाळेतील शिक्षकांमध्ये एकच तारांबळ उडाली होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी कारवाईची मागणी आहे.
स्वच्छता कर्मचाºयाला मोबदला म्हणून दिले जाते तांदूळ आणि डाळ
ग्रा.पं.च्या एक अस्थायी कर्मचाºयाकडून मुख्याध्यापक वºहाडे हे शाळेतील शौचालयाची स्वच्छता करून घेतात. या कर्मचाºयाला आर्थिक मोबदला देणे गरजेचे असताना त्याला चक्क विद्यार्थ्यांच्या वाटाचा असलेला तांदुळ व डाळ दिली जात असल्याचेही यावेळी येरणे, सेलूकर व देवढे तसेच पालकांच्या लक्षात आले. त्यामुळे येथील धान्यसाठ्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
पालकांना त्यांच्या पाल्याचा शाळा सोडल्याचा दाखला देणे सुरू आहे. शिवाय स्वच्छता कर्मचाºयाला तांदुळ व डाळ दिली जात नाही. शाळेचे विद्युत देयक शाळाच अदा करते. ते खिचडी शिजविणाऱ्यांकडून अदा करून घेतले जात नाही. माझ्यावर होणारे आरोप खोटे आहेत.
- लोमेश वºहाडे, मुख्याध्यापक, जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा, बोरगाव (मेघे).