रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण; मार्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 09:45 PM2019-07-08T21:45:57+5:302019-07-08T21:46:26+5:30
नजीकच्या बेनोडा येथील घरकुल लाभार्थ्याने स्वमालकीची जागा सोडून शासकीय आणि रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण करीत बांधकाम सुरू केलेले आहे. परिणामी रहदारीचा मार्ग बंद झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. घरकुलाचे बांधकाम तत्काळ थांबविण्यात यावे व शासकीय आणि रहदारीच्या मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी अजय कडू यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, आर्वी यांच्याकडे केली असून त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, वर्धा उपविभागीय अधिकारी, आर्वी, तहसीलदार, आर्वी व ठाणेदार आर्वी यांनाही पाठविण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : नजीकच्या बेनोडा येथील घरकुल लाभार्थ्याने स्वमालकीची जागा सोडून शासकीय आणि रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण करीत बांधकाम सुरू केलेले आहे. परिणामी रहदारीचा मार्ग बंद झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. घरकुलाचे बांधकाम तत्काळ थांबविण्यात यावे व शासकीय आणि रहदारीच्या मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी अजय कडू यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, आर्वी यांच्याकडे केली असून त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, वर्धा उपविभागीय अधिकारी, आर्वी, तहसीलदार, आर्वी व ठाणेदार आर्वी यांनाही पाठविण्यात आले आहे.
येथील घरकुल लाभार्थी बाबाराव मेश्राम व नीलेश बाबाराव मेश्राम यांनी घरकुल बांधकामासाठी स्वमालकीची जागा दाखविली; परंतु प्रत्यक्षात शासकीय व रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण करून बांधकाम सुरू केलेले आहे. त्यामुळे रहदारीचा मार्ग बंद झाल्याने नागरिकांना समस्येचा सामना करावा लागत आहे. ही बाब ग्रामसेविकेच्या निदर्शनास आणून दिली.
त्यांनी घरकूल लाभार्थ्यास समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, लाभार्थी अरेरावी करीत आहे. शिवाय बांधकाम सुरूच ठेवले आहे. पावसाळा सुरू झाल्याने या रहदारीच्या रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यामुळे शाळेत जाणाºया लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून केव्हाही अपघात होऊ शकतो.
ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, काही ग्रामपंचायत सदस्य अतिक्रमण करणाºया घरकुल लाभार्थ्याची पाठराखण करीत आहे. त्यामुळे प्रश्न सुटण्यापेक्षा वाद निर्माण होत आहे. अपघात घडल्यास ग्रामपंचायत सचिव, सरपंच व सदस्य जबाबदार असेल, असे ग्रामस्थ बोलत आहेत. गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत शासकीय व रहदारीच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी अजय कडू व गावकºयांनी केलेली आहे.
घरकूल दिल्यानंतर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर बांधकाम करणाऱ्याला समज नोटीस दिल्यावरही त्याचे बांधकाम सुरू होते. अतिक्रमणधारक ऐकण्यास तयार नाही.
मनोज परतेकी, सरपंच, माटोडा (बे.)
रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्याने ग्रा.पं.च्या जागेवर घरकूल बांधण्याकरिता खड्डे खोदकाम करून पिल्लर उभारणीकरिता पिंजरे उभे केले आहे. त्याला काम करण्यास मनाई केल्यानंतरही काम सुरूच होते. पोलिसांत तक्रार केल्यानंतर काम बंद केले.
दुर्गा चरडे, ग्रामसेविका, माटोडा (बे.)