शेवटी मृत्यूच जिंकला, आईच्या अंत्यसंस्काराला नाही जाता आले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 08:44 PM2020-08-01T20:44:34+5:302020-08-01T20:44:39+5:30
दरम्यान त्या रुग्णालयातील एक परिचारिका करोणा बाधित निघाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले.
आर्वी ( वर्धा): जीवन व मृत्यू यांच्या २१ दिवसांच्या लपंडावात अखेर मृत्यूने मात केली. गणपती वार्ड आर्वी येथील ७९ वर्षीय सरिजदेवी सुंदरलाल केला यांची ११ जुलैला प्रकृती बिघडली,आर्वी येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ.अरूण पावडे यांनी पुढील तपासणी व उपचाराकरिता बाहेर नेण्याचा सल्ला दिला त्याप्रमाणे त्याना अमरावतीच्या खासगी रुग्णालयात नेऊन त्यांची अंजिग्राफी करण्यात आली. तीन रक्त वाहिन्यांमध्ये बाधा असल्याने त्यांची १३ जुलैला अँजिओप्लास्टी करण्यात आली. दरम्यान त्या रुग्णालयातील एक परिचारिका करोणा बाधित निघाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले.
अमरावती येथील मुलाकडे असताना त्या पडल्या त्यात त्यांच्या पाठीचे हाड मोडले म्हणून पुन्हा दुसऱ्या दवाखान्यात भरती केले,दरम्यान अमरावतीचे खासगी रुग्णालय पुन्हा सुरू झाल्याने त्यांना तिथे हलवून हाड जोडण्याची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले, त्याच दिवशी या रुग्णालयाचा एक चिकित्सक करोना बाधित निघाल्याने तेथून केला यांना अमरावतीच्या दुस-या खासगी रुग्णालयात हलविले, तत्पूर्वी त्यांची करोणा चाचणी घेण्यात आली होती,तिचा अहवाल सकारात्मक आल्याने त्यांना अमरावतीच्या कोविद रुग्णालय असलेल्या दायासागर मध्ये रवानगी झाली,त्या ठिकाणी त्यांच्यावर फक्त कोबिड चाच उपचार सुरू राहिला. दरम्यान त्यांच्या संपर्कात आल्यावर कुटुंबातील ११ व्यक्तीची तपासणी करण्यात आली.
घरातील जी मंडळी सावलीसारखे त्यांच्या सोबत होते त्यांची चाचणी नकारात्मक आली, परंतु आर्वी येथून प्रकृती पहायला गेलेल्या संदीप नामक लहान मुलाचा चाचणी अहवाल सकारात्मक आल्याने त्यालाही दयासागर मध्ये भरती ठेवण्यात आले.त्याचा उपचार कालावधी संपल्यानतर तो आर्वीला आला व स्थानिक उपजिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या आदेशा प्रमाणे तो गृहविलिगिकरणात आहे.त्याच्या आईला आज सुट्टी मिळणार होती,परंतु त्यांचा दुसरा चाचणी अहवाल सकारात्मक आल्याने व त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांच्यावर तिथेच उपचार सुरू ठेवले दरम्यान १ऑगस्ट ला सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली.हे वृत्त आर्वी येथे गृहविलगीकर्णात असलेल्या संदीपला कळताच त्यास ते दुःख असह्य.झाले.तो ५० किलोमीटर अंतरावरील अमरावतीला जिल्हा बंदीमुळे जाऊ शकला नाही व व्हिडिओ वर आईचा अंत्यसंस्कार पाहत राहिला,हे पाहून उपस्थितांचे ही डोळे भरून आले.