जीवनाचा डाव अखेर ‘तो’ हरला
By admin | Published: September 11, 2016 12:39 AM2016-09-11T00:39:30+5:302016-09-11T00:39:30+5:30
तो लपाछपीचा डाव खेळत होता. मित्राबरोबर तो खेळ एवढा रंगात आला की, मित्रांना आपण दिसायचेच नाही
लपाछपी खेळताना सर्पदंश : उपचारादरम्यान नऊ वर्षीय चिमुकल्याचा अंत
सेलू : तो लपाछपीचा डाव खेळत होता. मित्राबरोबर तो खेळ एवढा रंगात आला की, मित्रांना आपण दिसायचेच नाही म्हणून तो अंधाऱ्या गल्लीत लपला; पण तेथे त्याला सर्पदंश झाला. खेळण्याच्या नादात ते कळलेही नाही. थोड्या वेळाने त्याला अस्वस्थ वाटू लागले. दवाखान्यात उपचारार्थ दाखल केल्यावर जन्म-मरणाचा डाव सुरू झाला. यात निष्पाप, निरागस आई-वडिलांचा एकुलता सुजल जीवनाचा डाव हरला आणि अख्खे कोटंबा गाव सुन्न झाले.
सुजल नरेश चिकराम (९) हा इयत्ता तिसरीचा विद्यार्थी बाल सवंगड्यांसोबत लपाछपी खेळत होता. यात मित्रांना दिसायचे नाही. मग, आपण डाव जिंकतो म्हणून तो अंधाऱ्या गल्लीत लपायला गेला. आधीच काळ बनून वाट पाहत असलेल्या विषारी सापाने त्याला दंश केला; पण खेळण्याच्या उत्साहात ही बाब त्याच्या लक्षात आली नाही.