झंझावाती व्यक्तिमत्त्वाला देश मुकला- ऊर्जामंत्री बावनकुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 04:59 PM2019-08-24T16:59:27+5:302019-08-24T16:59:29+5:30
प्रख्यात वकील, प्रभावी संसदपटू व माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन अत्यंत दुख:द
वर्धा - प्रख्यात वकील, प्रभावी संसदपटू व माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन अत्यंत दुख:द असून त्यांच्या निधनामुळे देश एका झंझावाती व्यक्तिमत्त्वाला मुकला असल्याची प्रतिक्रिया राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर- वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री व जलवाहतूक मंत्री म्हणून जेटली यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर देशात आर्थिक शिस्त आणली. अत्यंत महत्त्वाची कामगिरी त्यांनी या काळात पार पाडली. विद्यार्थी नेता ते राजकारणी हा त्यांचा झंझावाती प्रवास होता. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. अशा अत्यंत सक्रिय कार्यकर्त्याच्या जाण्याने भाजपाचे न भरून निघणारे नुकसान झाले असल्याची भावनाही पालकमंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केली.