‘त्या’ सबस्टेशनची ऊर्जामंत्र्यांनी घेतली दखल

By admin | Published: September 11, 2016 12:43 AM2016-09-11T00:43:12+5:302016-09-11T00:43:12+5:30

कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे सबस्टेशनचा बोजवारा उडाल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने शनिवारी प्रकाशित केले.

The energy minister of the substation has taken over | ‘त्या’ सबस्टेशनची ऊर्जामंत्र्यांनी घेतली दखल

‘त्या’ सबस्टेशनची ऊर्जामंत्र्यांनी घेतली दखल

Next

विजयगोपाल : कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे सबस्टेशनचा बोजवारा उडाल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने शनिवारी प्रकाशित केले. या वृत्ताची त्वरित दखल घेत ऊर्जामंत्री मदन येरावार यांनी संबंधित अभियंत्यांना रोहित्र बसविण्याच्या सूचना दिल्या. यामुळे ग्रामस्थांची समस्या निकाली निघणार आहे.
येथील सबस्टेशनचा कारभार रामभरोसे सुरू आहे. याबाबतच्या वृत्ताची उर्जा राज्यमंत्र्यांनी लगेच दखल घेत पुलगाव येथील अभियंता व विजयगोपालचे प्रभारी अभियंता यांना दूरध्वनीवर चौकशीचे आदेश दिले. आजच दोन्ही रोहित्र लावावे, असे आदेश दिले. आतापर्यंत का लावले गेले नाही, याची चौकशी करून अहवाल मागविला. शिवाय कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने दोन्ही अभियंत्यांना काय प्रकार चालू आहे, याची चौकशी करून मला त्वरित कळवा. लाईनमनची त्वरित बदली करून तेथे चांगल्या लाईनमनची नियुक्ती करावी, असे आदेश दिले.
या आदेशानंतर दोन्ही अभियंत्यांना जाग आली. त्यांनी लगेच दोन रोहित्र आर्वी येथून आणण्यासाठी कर्मचारी रवाना केल्याचे सांगण्यात आले. शनिवारी सायंकाळपर्यंत दोन्ही रोहित्र लागतील, असे येथील सबस्टेशनचे प्रभारी अभियंता तिमांडे यांनी सांगितले. उर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनी दखल घेतल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परिणामी, ओलित शक्य होणार आहे.(वार्ताहर)

सेवाग्राम मार्गावरील जलवाहिनीची दुरूस्ती
सेवाग्राम : वर्धा ते सेवाग्राम मार्गावरील जलवाहिनी फुटल्याबाबत ‘लोकमत’ वृत्त प्रकाशित केले. याची नगर परिषदेने दखल घेत ती दुरूस्त केली. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सेवाग्राम ते वर्धा मार्गावर महिलाश्रमच्या पूढे पालिकेची जलवाहिनी गेली आहे. हनुमान मंदिराजवळ दोन ठिकाणी तर पेट्रोलपंपाजवळ एका ठिकाणी ती लिक झाली होती. यात मंदिराजवळचा लिकेज मोठा असल्याने डबके साचले होते. जलवाहिनीतून वर्धावासियांना पाणी पुरवठा होत असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच दुरूस्ती झाली. ती कायमस्वरूपी होणार काय, हा प्रश्नच आहे. याच ठिकाणी नेहमी लिकेज होत असल्याने आरोग्याचा प्रश्न कायम आहे. पालिकेने याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)

Web Title: The energy minister of the substation has taken over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.