बांधकाम विभागाच्या अभियंत्यास १ लाखांची लाच स्विकारताना अटक

By चैतन्य जोशी | Published: April 6, 2023 04:56 PM2023-04-06T16:56:48+5:302023-04-06T16:57:07+5:30

घरात सापडली ६.४० लाखाची रोकड : वर्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Engineer of construction department arrested while accepting bribe of 1 lakh | बांधकाम विभागाच्या अभियंत्यास १ लाखांची लाच स्विकारताना अटक

बांधकाम विभागाच्या अभियंत्यास १ लाखांची लाच स्विकारताना अटक

googlenewsNext

वर्धा : शासकीय वृक्ष लागवडीचे ५० लाख रुपयांचे देयके मंजूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नारायणदास बुब (५७) यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी एक लाख रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई ६ रोजी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. पिपरी (मेघे) येथील रहिवासी तक्रारदार यांच्या संस्थेचे शासकीय करारानुसार वृक्ष लागवडीचे पूर्वी तीन टप्प्यांचे देयके मिळाले होते.

चौथ्या टप्प्यांतील ५० लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी कार्यकारी अभियंता प्रकाश बुब हे तक्रारदाराला त्रास देत होते. तसेच मंजूर देयकावर पाच टक्क्यांची मागणी करु लागले. तक्रारदाराने लाचेची रक्कम देण्यास असर्मथता दाखविली असता देयकं काढून देण्यासाठी कार्यकारी अभियंता बुब टाळाटाळ करीत होते. अखेर प्रकाश बुब याने १ लाख रुपयांची मागणी केली. ठरल्याप्रमाणे ६ रोजी तक्रारदार कार्यकारी अभियंता प्रकाश बुब याच्या निवासस्थानी एक लाख रुपये घेऊन गेला. प्रकश बुब याने लाच स्विकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी छापा मारुन लाच स्विकारताना रंगेहात पकडले. आरोपी प्रकाश बुब याला लाचलुचपत विभागाने अटक करुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक डी.सी. खंडेराव यांच्या मार्गदर्शनात संतोष बावणकुळे, प्रशांत वैद्य, प्रदीप कुचनकर, प्रितम इंगळे, प्रशांत मानमोडे यांनी केली.

घरात सापडले ६.४० लाख
कार्यकारी अभियंता प्रकाश बुब याने तक्रारदाराकडून १ लाख रुपयांची लाच स्विकारताना पोलिसांनी अटक केली. दरम्यान त्यांच्या घराची तपासणी केली असता लाचेच्या रकमे व्यतिरिक्त त्याच्या घरात ६ लाख ४० हजार रुपयांची रक्कम मिळाली. ती रक्कम व्हिडीओग्राफी करुन जप्त करण्यात आली.

Web Title: Engineer of construction department arrested while accepting bribe of 1 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.