ईसाच्यावतीने आज इंग्रजी शाळा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:43 AM2019-02-25T00:43:58+5:302019-02-25T00:44:37+5:30
इंग्रजी शाळेच्या समस्यांची दखल राज्य शासशाने अद्यापही घेतली नसल्याने इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशन (ईसा) या संघटनेच्या वतीने २५ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय इंग्रजी शाळा बंदचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : इंग्रजी शाळेच्या समस्यांची दखल राज्य शासशाने अद्यापही घेतली नसल्याने इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशन (ईसा) या संघटनेच्या वतीने २५ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय इंग्रजी शाळा बंदचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
१ नोव्हेंबर २०१८ चा शासन निर्णय मागे घेण्यात यावा, २०१२ ते २०१९ पर्यंत आर.टी.ई.२५ टक्के प्रवेशाचा परतावा शासनाने त्वरित अदा करावा, राज्यातील सर्व शाळासाठी शाळा संचरणा कायदा करण्यात यावा, २०१८ नोव्हेंबर २०१३ च्या शासन आदेशात दुरुस्ती करण्यात यावी, शालेय विद्यार्थी वाहतूक संदर्भात मुख्याध्यापक ऐवजी शाळेने नियुक्ती केलेल्या वाहतूक व्यवस्थापकावर जबाबदारी सोपविण्यात यावी, स्वयं अर्थसहाय्यीत तत्वावर दर्जा वाढ प्रस्तावासाठी आँनलाईन प्रक्रिया तातडीने सुरू करावी अशा विविध मागण्यांसाठी हा बंद असल्याचे अविनाश सोमनाथे यांनी सांगितले. संघटना मागील सहा वर्षांपासून इंग्रजी शाळेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य करीत आहे. शासनाने मागण्यांची दखल घेतली नसल्याने सोमवारी महाराष्ट्रातील इंग्राजी शाळा बंद चा निर्णय घतला आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष अविनाश सोमनाथे, अतुल किटे, सचिन जयसवाल, सुनील पराते, सुनील शिंदे, पंकज इंगोले आदींची उपस्थिती होती.