संगीत मैफिलने रंगला आनंदी कट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 11:35 PM2018-06-30T23:35:49+5:302018-06-30T23:36:12+5:30
एकापेक्षा एक सरस गितांनी स्थानिक अनेकान्त स्वाध्याय मंदिर आनंदी कट्टाचा विशेष कार्यक्रम पार पडला. गायिका प्रमोदिनी क्षत्रिय यांनी सादर केलेल्या बहारदार गितांमुळे उपस्थितांसह रसिक मंत्रमुग्ध झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : एकापेक्षा एक सरस गितांनी स्थानिक अनेकान्त स्वाध्याय मंदिर आनंदी कट्टाचा विशेष कार्यक्रम पार पडला. गायिका प्रमोदिनी क्षत्रिय यांनी सादर केलेल्या बहारदार गितांमुळे उपस्थितांसह रसिक मंत्रमुग्ध झाले होते.
व्यासपीठावर प्रा. संध्या देशमुख, महावीर पाटणी, प्रा. रोहण कठाणे, धनंजय नाखले आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात जैष्ठ समाजसेवक मुलचंद जैन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. त्यानंतर बाल गायकांनी ‘हे सृष्टीच्या रचनाकारा’ हे संजय इंगळे तिगावकर यांनी लिहिलेले गित सादर केले. तसेच प्रभाकर उघडे लिखित आनंदीकट्टाच्या शिर्षकाचे गीतही सादर करण्यात आले. यानंतर काळाच्या ओघात अंतधान पावलेल्या कलाकांना व कविवर्य स्व. गुरूदेव उरकुडे, कमल वाशिमकर, विमल सोईतकर व जयंत मादुस्कर यांना मावळत्या दिनकरा या गितातून आदरांजली अर्पण करण्यात आली.
मोगरा फुलला हे गित सादर करून गायिका प्रमोदिनी क्षत्रिय यांनी मैफलीत उपस्थितांच्या चेहराऱ्यावर आनंद फुलविले. तर लगजा गले, आजारे मै कबसे खडी, आयेगा आनेवाला ही जुनी गिते सादर करून उपस्थितांकडून कौतुकाची थाप मिळवून घेतली. ती गेली तेव्हा रिमझिम, रंजीश ही सही, जीवनात ही घडी, तरुण आहे रात्र अजूनी, वाळवंटातून भीषण वैराण, छोटासा बालमा या भावस्पर्शी गीत त्यांनी यावेळी सादर केली.
मैफिलीत त्यांनी एकापेक्षा एक सरस गितांसह गजलही सादर केल्या. हार्मोनियमची साथ अजय हेडाऊ, बंटी चहारे तर तबल्याची साथसंगत आकाश चांदूरकर वासुदेव गोंधळे यांनी केली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. संध्या देशमुख यांनी केले.
कार्यक्रमाला प्राचार्य मोनिका रतनपरज, वीरेंद्र भागवतकर, घनश्याम सावळकर, अरुण चवडे, डॉ. बेंदुर, सुधीरचंद्र राईकवार, कृष्णराव मंदुलवार, मनोहर देऊळकर, भीमराव भोयर, शंकर मोहोड, संगीता इंगळे, स्मिता हेडाऊ, शोभा कदम आदींची उपस्थिती होती. यशस्वीतेकरिता अरुण चवडे, प्रल्हाद इंगळे, विलास ढुमणे, वासुदेव गोंधळे, विकास गुज्जेवार, ज्योत्स्रा ढुमणे, शेखर देशमुख, शंकर मोहोड आदींनी सहकार्य केले.
बालकांसह ज्येष्ठांनी सादर केल्या रचना
कार्यक्रमादरम्यान काही जेष्ठ कवींनी आपल्या कविता सादर केल्या. यावेळी डॉ. पुष्पा फाले यांनी मोसे काहे करे रे जोरारोजी, प्रभाकर उघडे यांनी स्वप्नातल्या कळ्यांनी जागेपणी फुलावे तर एक आकाश हळव ही कविता ही सादर केली. काव्य व गितांना संगीत संध्या देशमुख यांनी दिले. तर बाल गायिका अवन्तिका ढुमणे, रीना गायधने तसेच सानिका बोभाटे यांनी त्या आपल्या सुरेल आवाजात गायल्या.