भोंदूगिरी करणाऱ्यांना अंनिसने घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 11:12 PM2019-04-01T23:12:45+5:302019-04-01T23:12:59+5:30
कौटुंबिक तंटे व एखादी संकट दूर करण्यासाठी तसेच कुणाला मुल होत नसेल तर मुल होण्यासाठी काळ्या घाड्याची नाल व त्यापासून तयार करण्यात आलेली अंगठी फायद्याची ठरते, असा दावा करीत काळ्या घोड्याची नाल व अंगठीची विक्री वर्धा शहरात परप्रांतातील काही जण करीत होते.
वर्धा : कौटुंबिक तंटे व एखादी संकट दूर करण्यासाठी तसेच कुणाला मुल होत नसेल तर मुल होण्यासाठी काळ्या घाड्याची नाल व त्यापासून तयार करण्यात आलेली अंगठी फायद्याची ठरते, असा दावा करीत काळ्या घोड्याची नाल व अंगठीची विक्री वर्धा शहरात परप्रांतातील काही जण करीत होते. सदर प्रकार भोंदूगिरी करीत अंधश्रद्धा पसरविणारा असल्याने आणि याची माहिती मिळताच सदर भोंदूगिरी करणाऱ्यांचा शोध घेऊन अ.भा. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना ताब्यात घेत शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.
खोटी बतावणी करून अंधश्रद्धा पसरविल्या जाईल अशाच पद्धतीने वर्धा शहरात काही तरुण काळ्या रंगाच्या घोड्यांची नाल व नाल पासून तयार करण्यात आलेली अंगठी विक्री करीत असल्याची माहिती अ.भा. अंनिसच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. सदर माहिती मिळताच अ.भा. अंनिसच्या पदाधिकाºयांनी घटनास्थळ गाठून सदर तरुणांबाब अधिक माहिती जाणून घेतली. यावेळी सदर तरुण खोटी बतावणी करून नागरिकांना गंडा घालत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या इतर साथीदारांचाही शोध घेण्यात आला. त्यानंतर या तरुणांना चार काळ्या रंगाच्या घोड्यांसह ताब्यात घेत अ. भा. अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस ठाणे गाठले. शिवाय, या तरुणांवर अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. सदर व्यक्तींकडे चार काळ्या रंगाचे घोडे, इतर साहित्य असून वृत्तलिहिस्तोवर तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.