गणरायाच्या आगमनाचा उत्साह

By admin | Published: September 15, 2015 04:54 AM2015-09-15T04:54:07+5:302015-09-15T04:54:07+5:30

अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाचे आगमन गुरुवारी जिल्ह्यात सर्वात्र होत आहे. गणपती ही बुद्धीची

The enthusiasm of the arrival of Ganaraya | गणरायाच्या आगमनाचा उत्साह

गणरायाच्या आगमनाचा उत्साह

Next

वर्धा : अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाचे आगमन गुरुवारी जिल्ह्यात सर्वात्र होत आहे. गणपती ही बुद्धीची देवता. जेवढी ती मोठ्यांसाठी श्रद्धस्थ तितकीच लहानांनाही प्रिय. म्हणूनच लहान मुले माय फ्रेंड गणेशा घरी येणार या आनंदानेच हरखून गेली आहे. प्रत्येकाला हा सण सेलिब्रेट करायचा असतो. त्यामुळे शहरातील बाजारही सजावटीच्या वस्तूंनी सजला आहे. महागाईची कडवट किनार त्याला असली तरी जल्लोषात कुठेही ती जाणवत नाही. गणपती म्हटलं की सर्वप्रथम त्याची पूजा किंवा त्याची आराधना कशी करायची हा प्रश्न न पडता गणेशाची सजावट कशी करायची हाच विचार येतो. मित्रांसाठी तो सखा असतो तर मोठ्यांसाठी आराध्य. आपल्या घरची सजावट सर्वात वेगळी असावी हा ज्याचा त्याचा प्रयत्न असतो. प्लास्टिकची विविधरंगी फुले, माळा, गणपतीची वस्त्रे, दागिने, ओढण्या अशा सर्वांची सरमिसळ करून गणेशाला विराजमान करण्याच्या जागेची सजावट केली जाते. यातील पारंपरिकता बाहुतांशी कमी झाली असली तरी श्रद्धेला मॉडर्न टच दिसत आहे.(शहर प्रतिनिधी)

थर्माकॉलच्या ग्राफिकल डिझाईन
४सगळी सजावट केली तरी गणपतीला कुठे विराजमान करायचे हा प्रश्न असतोच. त्यासाठी सर्वात साधा आणि सर्वोत्तम मार्ग म्हणजे थर्माकॉलची घरे. शहरात ग्राफिकल नक्षिकाम असलेली घरे यंदा उपलब्ध आहेत. यातील काही घरे स्थानिक कारागीर बनवित असली तरी राजस्थानी पद्धतीची राजवाड्याची डिझाईन असलेली घरे नागपूरवरून मागविण्यात येतात. आधी ही घरे पातळ थर्माकॉलच्या सहाय्याने बनविल्याने ती टिकत नव्हती. आता मात्र जाड थर्माकॉलची घरे विक्रीस दिसतात. किमान दोन ते तीन वर्ष तरी ती टिकतात. ३०० रुपयांपासून तर १५०० रुपयांपर्यंत ही घरे विक्रीस असल्याचे स्थानिक विक्रेते सांगतात.

मक्याच्या कणसाची मागणी वाढली
४गौरी, गणपती हरतालिका अशा सणाच्या काळात मक्याच्या कणसांची मोठी मागणी असते. पावसाअभावी महिनाभरापूर्वी मक्याची मागणी घसरली असली तरी सणांची चाहूल लागतात मक्याची मागणी वाढली आहे. त्याचबरोबर मक्याची कणसे सध्या स्वस्त असल्याचेही दिसून येत आहे. बाजारात दहा रुपयांत मक्याची कणसे विक्रीस उपलब्ध आहे. या काळात मक्याचे सेवन करणे शरिरारासाठी अतिशय पौष्टिक असते.
मोदकाचे साचे विक्रीला
४गणेशोत्सवात मोदकाला अनन्यसाधारण महत्त्व असते. गणेशाला सर्वप्रथम मोदकाचाच नैवेद्य दाखविला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे मोदकाचे साचे विक्रीस असून पारंपरिक मोदकांबरोबरच वेगळे मोदकही बनविले जातात.

फुलांच्या झाडांची मागणी तेजीत
४ईको फ्रेंडली गणेशोत्सवाची आवड असणारे अनेक जण गणपतीच्या सभोवाताल फुलांच्या कुंड्या ठेवण्यावर भर देतात. पण झाडांना या काळात फुले असतीलच असे नसते. त्यामुळे फुले लागून असलेली झाडेच विकत घेण्यावर जास्त भर असतो. या कारणाने शहरातील नर्सरींमध्ये अशा फुलांच्या झाडांची मागणी वाढली आहे. यात सजावटीच्या फुलांची मागणी जास्त असल्याचे दिसते.

ईकोफ्रेंडली गणेशोत्सव दूरच
४कुठलाही सण साजरा करताना आपण निसर्गाचे सर्वाधिक दोहन करीत असतो. शाडूच्या मूर्ती बनविताना त्यात काही प्रमाणात प्लास्टर आॅफ पॅरिसचा उपयोग केला जातो. तसेच रंगांमध्येही रसायनांचा वापर केला जातो. यामुळे पाणी दूषित होते. घरच्या घरी एका बादलीत गणेशाचे विसर्जन करावे असे आवाहन शासनाद्वारे केले जाते. पण त्याचा अवलंब होताना दिसत नाही.
व्हॉटस अ‍ॅपवर गणेशोत्सवाचा जल्लोष
४सर्वाच्या हृदयात सध्या कुणी स्थान घेतले असेल असा प्रश्न विचारला तर त्याचे एकमुखी उत्तर असेल व्हॉट्स अ‍ॅप. प्रत्येक सण व्हॉट्स अ‍ॅपवर साजरा करण्याचा चंगच तरुणांनी बांधला आहे. आतापासूनच बाप्पा मोरया, जय गणराय अशी विविध नावे आपल्या ग्रूपला दिली जात आहे. बहुतेक जण आपल्या आयकॉनवर गणपतीचे चित्र ठेवत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅप वर गणपतीचा जल्लोष आतापासूनच सुरू झाला आहे.निरनिराळी अ‍ॅपही यासाठी तयार करण्यात आली आहे.

शाळांमध्येही जल्लोषाचे वातावरण
४जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये गणपतीची स्थापना केली जाते. यासाठी मुलेही आनंदून असतात. सर्व तयारी मुलांकडून करून घेतली जाते. मुलेही आनंदाने यात सहभागी होतात. यात बरेचदा पर्यावरण बचाव असा संदेश देणारे देखावे तयार केले जातात. या काळात शाळांमध्ये विविध उपक्रम आणि स्पर्धाही घेतल्या जातात.
मंडळांच्या गणेशाची तयारी सुरू
४जिल्ह्यात मंडळाच्या गणेशाची तितकीशी धूम नसली तरी कमी अधिक प्रमाणात सार्वजनिक गणेशाची स्थापना केली जाते. शंभरावर गावांमध्ये एक गाव एक गणपतीची स्थापना केली जातो. यासाठी पेंडॉल उभारण्याचे काम सुरू आहे.

बहुतांश गणपती झाले बुक
४जिल्ह्यात गणपती उत्सवात कोट्यवधीची उलाढाल असते. सार्वजनिक गणपतीचे तितके प्रस्थ नसले तरी घरोघरी शाडूच्या मातीच्या गणपतीची स्थापना केली जाते. चांगल्या रंगांचे व आकर्षक बनावटीचे गणपती घेण्यासाठी बहुतेक जण शहरात येतात. आयत्या वेळी मनासारखा गणपती मिळत नसल्याने जो तो आधीच गणपती बघून तो बुक करून ठेवत आहे.
४शहरातील बहुुतेक मुख्य कारागिरांच्या घरी गणपती रंगविण्याची तयारी पहावयास गेल्यावर गणपतीच्या डोक्यावर बुक झाल्याची चिठ्ठी नजरेस पडते. सर्वत्र कारागीर मूर्तींना अखेरचा हात मारताना दिसत आहे. अनेकदा नावात घोळ झाल्यामुळे गणपतींची सरमिसळ होते. त्यामुळे एकाचा गणपती अन्य कुणाला दिल्याचे प्रकारही घडत असतात. असे होऊ नये यासाठीच कारागीर जास्त काळजी घेत आहेत. बाहेरूनही अनेक गणपती विक्रेते शहरात गणपती विक्रीसाठी घेऊन आले आहे.

Web Title: The enthusiasm of the arrival of Ganaraya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.