८०० विद्यार्थ्यांनी कुंचल्यातून साकारली पर्यावरणाबाबतची सजगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 10:23 PM2017-12-11T22:23:29+5:302017-12-11T22:24:11+5:30
निसर्ग सेवा समितीच्यावतीने आयटीआय टेकडीवर पर्यावरण संरक्षणाकरिता चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : निसर्ग सेवा समितीच्यावतीने आयटीआय टेकडीवर पर्यावरण संरक्षणाकरिता चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील एकूण ८०० विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांना दिलेल्या विषयानुसार त्यांनी आपल्या कुंचल्यातून पर्यावरणाबाबतची सजगता रेखाटल्याचे दिसून आले. विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
म्हाडा कॉलनी जवळील आयटीआय जलशुद्धीकरण केंद्राच्या टेकडीवर १८ वर्षांपुर्वी निसर्ग सेवा समिती द्वारे लावलेल्या वृक्षराजीच्या हिरवळीमध्ये स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन दीप प्रज्वलीत व वृक्ष पुजन करून ज्येष्ठ वन्यऋषी मारोती चितमपल्ली, बँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक मुरलीकृष्ण राजू, वर्धा विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आशीष गोस्वामी, ओंकार धावडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
उत्कृष्ट स्पर्धकास पुरस्काराचे वितरण मारूती चितमपल्ली, हिंदी विश्व विद्यापीठाचे कुलगुरू गिरीश्वर मिश्र, उपवनसंरक्षक दिगंबर पगार, गांधी विचार परिषदेचे भरत महोदय, बँक आॅफ इंडियाचे मुरलीकृष्ण राजू, मोहन गुजरकर, प्रदीप दाते, चंद्रकला रागीट, विद्यापीठाचे दूरसंचारक विभाग प्रमुख अंकीत राय यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे आयोजन व समितीच्या कार्याची माहिती समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी प्रास्ताविकातून दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. शोभा बेलखोडे, रूपेश रेंगे व रितेश निमसडे यांनी केले.
स्पर्धेत महाविद्यालयीन गटात, शासकीय कला महाविद्यालयाचा तुषार राऊत, नितू मेश्राम, न्यू इंग्लिश महाविद्यालयाची अंजली करपाते, न्यू आर्टस्ची ऋतिका बोबडे, पुजा कुबडे यांना पुरस्कृत केले. वर्ग आठ ते दहावीपर्यंतच्या गटात स्कूल आॅफ स्कॉलरचा गोडविन शालन, शासकीय निवासी शाळेचा साहिल भगत, केसरीमल कन्या शळेची तेजस्विनी मरसकोल्हे, न्यू इंग्लिश कॉन्व्हेंटची दिप्ती बावणकर, सावित्रीबाई फुले शाळेची आम्रपाली भगत, वर्ग ५ ते ७ च्या गटात स्कूल आॅफ स्कॉलरची मेधावी मेहत्रे, ओम रघाटाटे, लोक विद्यालयाची तन्वी बकाले, सुशील हिम्मतसिंगकाची ऋतुजा घोटेकर, न्यू इंग्लिश कॉन्व्हेंटची समिक्षा चलाख, वर्ग १ ते ४ गटात वर्ग पहिला सरस्वती विद्यालचा पलक लुटे, महिलाश्रमची रिधीमा शेंडे, सरस्वती विद्यालयाची शोली उसे, केंद्रीय विद्यालयाचा सार्थक ठाकरे, महिलाश्रम बुनियादी संस्कार वाटगुळे, वर्ग दुसऱ्या मधील, अँन्थोनी शाळेचा सृजल गोपी माटे, अग्रग्रामीचा सोहम आतकरे, शारदा मुकबधिर विद्यालय चैतन्य डुकरे, अग्रगामीची पलक सोनारकर, केंद्रीय विद्यालयाचा अनूप राऊत यांना पुरस्कार मिळाला.
तिसºया वर्गातील गटात केंद्रीय विद्यालयाची जानवी उडान, श्रावणी चुटे, शारदा मुक बधिर विद्यालयाची वैष्णवी बावणे, केंद्रीय विद्यालयाची आंशिक कत्रोजवार, शारदा मुक बधिर विद्यालयाची रूतिका लुटे, चवथ्या वर्गाच्या गटात अग्रगामी विद्यालयाचा ओम श्रीस्वामी, बिडीएमचा ओंकार ठाकरे, रमाबाई देशमुख शाळोचा ओम बुचे, केंद्रीय विद्यालयाची आकांशा अजय तायडे, स्कूल आॅफ ब्रिलीयंटची दीक्षा कुंदन यांना स्मृतिचिन्ह, वृक्षरोप, ग्रामगीता, प्रमाणपत्र देवून पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. चित्रांचे परीक्षण राजेराम लांजेवार, मनोज कत्रोजवार, सुनील येनकर, अक्षय मोरे यांनी केले.