पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम

By admin | Published: June 6, 2017 01:17 AM2017-06-06T01:17:53+5:302017-06-06T01:17:53+5:30

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सामाजिक वनीकरण विभाग वर्धा व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण...

Environment Day-Plantation Program | पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम

पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सामाजिक वनीकरण विभाग वर्धा व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी जिल्हा व सत्र न्यायाधीश रायकर उपस्थित होते.
जागतिक तापमान वाढ, हवामानात होणाऱ्या बदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी वृक्षलागवड व संगोपन गरजेचे असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा न्यायाधीश चांदेकर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर पाटील, मुख्य न्यायदंडाधिकारी माने, दिवाणी न्यायाधीश अग्रवाल, तिजारे, शेंडे, आयचित, चव्हाण, ओस्तवाल, अधिक्षक चवरे, वाडकर, वनक्षेत्रपाल, बी.डी. खडतकर, राठोड व कर्मचारी उपस्थित होते.
केसरीमल

Web Title: Environment Day-Plantation Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.