Ganeshotsav 2022 : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन
By अभिनय खोपडे | Updated: September 9, 2022 14:03 IST2022-09-09T14:01:42+5:302022-09-09T14:03:04+5:30
Ganeshotsav 2022 : सकाळपासून २९ गणेशमुर्तीचे या केंद्रावर विसर्जन करण्यात आले.

Ganeshotsav 2022 : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन
वर्धा - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व अनेकान्त स्वाध्याय मंदीर यांच्या सहकार्याने २००६ पासून वर्धेतील गणेश भक्तांसाठी सुरू केलेल्या अनेकान्त स्वाध्याय मंदीर येथील पर्यावरण पुरक गणेश विसर्जन केंद्रावर डॉ. शर्मा यांनी कुटुंबीयांसह घरच्या गणेश मुर्तीचे विसर्जन करुन मोहिमेला सुरुवात करण्यात आली. सकाळपासून २९ गणेशमुर्तीचे या केंद्रावर विसर्जन करण्यात आले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वर्धेत २००६पासून पर्यावरण पुरक गणेशमुर्ती विसर्जन मोहिम सुरू करून वर्धेकरांना वर्धेतील विविध ठिकाणी रोटरी क्लब व अनेकान्त स्वाध्याय मंदीर यांच्या सहकार्याने गणेश मुर्ती विसर्जन केंद्र सुरू करून वर्धेकरांना पर्याय उपलब्ध करून दिला. पुढे जनतेत जागृती निर्माण होऊन अनेक सामाजिक संघटनांनी या मोहिमेत सहभागी होऊन ही मोहीम सुरू केली. तर समितीने प्रशासनाशी संवाद साधून व सतत पाठपुरावा करून पावणार येथे गणेश विसर्जन कुंड तयार करून घेतले व नगर परिषदेनेही या मोहिमेत सहभाग घ्यावा यासाठीही पाठपुरावा केला याचाच परिणाम म्हणून सामाजिक संघटनां, प्रशासनही या मोहिमेत सहभागी झाले.
महाराष्ट्र अंनिस व्दारे इतर केंद्रे बंद करुन अनेकान्त स्वाध्याय मंदिर हे केंद्र सुरू ठेवले या पर्यावरण पुरक गणेश विसर्जन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी यावेळी अरुण चवडे, गजेंद्र सुरकार, प्रकाश कांबळे, सचिन मेश्राम, सुनिल ठाले, निखिल जवादे अनेकान्त स्वाध्याय मंदिरचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.