जीवशास्त्र विभागाद्वारे पर्यावरणावर जनजागृती
By admin | Published: October 13, 2014 11:26 PM2014-10-13T23:26:23+5:302014-10-13T23:26:23+5:30
स्थानिक जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागांतर्गत सत्र २०१४-१५ करिता झुआॅलाजीकल सोसायटीची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमात पर्यावरण आणि ओझोन विषयावर
वर्धा : स्थानिक जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागांतर्गत सत्र २०१४-१५ करिता झुआॅलाजीकल सोसायटीची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमात पर्यावरण आणि ओझोन विषयावर जनजागृती करण्यात आली.
याप्रसंगी नागपूरचे नीरी येथील शास्त्रज्ञ डॉ. एस. के. गोयल प्रमुख पाहुणे म्हणून तर प्रभारी प्राचार्य प्रा. जी. एन. वाघ कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपस्थित होते. मंचावर झुआॅलाजीकल सोसायटीचे समन्वयक डॉ. विशाल शर्मा, प्राणीशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमोल ठेंग, प्रा. वैभव खांडवेकर आणि प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख उपस्थित होते. पर्यावरण व वायूप्रदूषणाच्या अभ्यासाचा २७ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. गोयल यांनी पर्यावरणातील ओझोनचा थर, त्याचे फायदे, त्याचा दिवसेंदिवस होणारा ऱ्हास आणि या बहुमुल्य थराचे संवर्धन करण्यासाठीचे उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी समन्वयक डॉ. विशाल शर्मा यांनीही यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमात झुआॅलाजीकल सोसायटीची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष सपना बघेल, सचिव झावेरी सोनी, सदस्य साक्षी पोतदार, माधुरी माहोरे, मेहनाज नूराणी, नयना पलेरिया, बिजेसरा वर्गीस, मीनल गुरनुले, प्रांजली मिसाळ, डीम्पल जोशी, मिर्झा बेग, रोहित तेलंग, शोएब खान व माधव व्यास या पदाधिकाऱ्यांची निवड केली. संचालन साक्षी पोतदार तर आभार मेहनाज अली ह्यांनी केले. यशस्वीतेकरिता प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक व झुआॅलॉजीकल सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले कार्यक्रमाला प्राध्यापक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)