११ हजार घरांमध्ये होणार गणरायाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:43 PM2017-08-23T23:43:10+5:302017-08-23T23:43:38+5:30

राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. जिल्ह्यातही गणेशोत्सवाची धूम असते. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

Establishment of Ganapraya will be done in 11 thousand houses | ११ हजार घरांमध्ये होणार गणरायाची स्थापना

११ हजार घरांमध्ये होणार गणरायाची स्थापना

Next
ठळक मुद्दे३०८ सार्वजनिक मंडळे : ९२ गावांत ‘एक गाव एक गणपती’

श्रेया केने।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. जिल्ह्यातही गणेशोत्सवाची धूम असते. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यात ११ हजार ६१९ घरांमध्ये श्रीगणेशाची स्थापना करण्यात येणार आहे. शुक्रवारी ही स्थापना होणार असून ३०८ सार्वजनिक गणेश मंडळे गणरायाची आराधना करणार आहेत. यातील ९२ गणेश मंडळांद्वारे ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांवरही बरीच बंधने लादली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असले तरी गणरायाच्या श्रद्धेपोटी भाविक सर्व सहन करून जल्लोषात आपल्या गणपतीची आराधना करणार आहे. यासाठी सर्व सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात गणेशोत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणेने पूर्वतयारी चालविली आहे. गणेशोत्सव काळात बंदोबस्ताकरिता ६०० पुरूष गृहरक्षक तैनात करण्यात येणार आहे. शिवाय राज्य राखीव दलाच्या १५० पोलीस कर्मचाºयांची एक कंपनी तैनात करण्यात येणार आहे. ११ हजार ६१९ घरांमध्ये गणरायाची आराधना केली जाणार असून त्यासाठी मूर्तीकारांनी मोठ्या प्रमाणात मूर्ती बाजारात उपलब्ध करून दिल्याचे दिसते.
मंदीच्या सावटात गणपतीच्या आगमनाची तयारी
लाडक्या गणरायाच्या आगमनाची सर्व आतुरतेने वाट पाहतात. गणेशाच्या स्वागताची घरोघरी जय्यत तयारी केली जाते. गणरायाचे आगमण दोन दिवसांवर असून बाजारपेठेत मात्र त्याची चाहुल जाणवली नाही. नोटबंदी, पावसाचा लहरीपणा यामुळे ग्रामीण भागात अर्थव्यवस्था मोडकळीस आली. याचा परिणाम वस्तूंच्या विक्रीवर दिसतो. दरवर्षी लाखोच्या घरात होणारी विक्री यंदा ५० हजारांवरही पोहोचली नसल्याचे विक्रेते सांगतात. यामुळे मंदीच्या सावटात गणरायाचे आगमन होण्याची चिन्हे आहेत. बाजारपेठ विविध वस्तूंनी सजली असून खरेदीसाठी ग्राहक नसल्याने उठाव नाही. फेरफटका मारला असता फारशी गर्दी नव्हती. ग्रामीण भागातून येणारे ग्राहक कमी झाल्याचे दिसले.
चीनी वस्तूंचा शिरकाव कमी
सण, उत्सव काळात बाजारपेठेत चीनी वस्तूंचा शिरकाव होतो; पण यंदा स्थानिक कलाकारांनी तयार केलेल्या वस्तूंचा समावेश असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. गौरी गणपतीकरिता लागणारे लाईटिंग वगळता सर्व वस्तू स्थानिक पातळीवर निर्मित आहेत. गणरायाची आरास करण्यासाठी तोरण, हार, लटी, आसन, टोप अशा विविध वस्तू विक्रीला आहे. कार्डबोर्डच्या रांगोळीला यंदा अधिक मागणी आहे.
प्लास्टिक फुलांच्या तोरणाची चलती
गणपती, महालक्ष्मीकरिता लागणाºया फुलांच्या हारांची किंमत या काळात वधारते. सध्या प्लास्टिकच्या फुलांपासून निर्मित हारांची मागणी केली जात असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. प्लास्टिक फुलांचे हार दीर्घकाळ टिकतात. शिवाय ते दिसायला आकर्षक असतात. यंदा पावसाचा लंपडाव सुरू असल्याने फुलांच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचे दिसून येते. फुलांची आवक घटल्याने किंमत वाढणार आहे.

Web Title: Establishment of Ganapraya will be done in 11 thousand houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.