ओबीसींच्या विकासासाठी जातीयनिहाय जनगणना गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 06:00 AM2020-02-03T06:00:00+5:302020-02-03T06:00:15+5:30

संताजी सेवा सांस्कृतिक मंडळ, कृष्णनगर वर्धाच्यावतीने आयोजीत तेली समाज उप वधु-वर व पालक परिचय मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, माजी खासदार सुरेश वाघमारे, नगराध्यक्ष अतुल तराळे, शेखर शेंडे, प्रविण हिवरे, मिलिंद भेंडे, रविकांत बालपांडे यांची उपस्थिती होती

Ethnicity based census is needed for the development of OBCs | ओबीसींच्या विकासासाठी जातीयनिहाय जनगणना गरजेची

ओबीसींच्या विकासासाठी जातीयनिहाय जनगणना गरजेची

Next
ठळक मुद्देरामदास तडस : तेली समाज उप वधू-वर व पालक परिचय मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशातील काही समाज घटक काही ऐतिहासिक कारणामुळे, इतर समाज घटकापासून सर्वच क्षेत्रात मागासलेले राहिले. ते जोपर्यंत इतर समाजाच्या बरोबरीस येत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने समतेचे तत्वज्ञान प्रत्यक्षात येवू शकणार नाही. भारतीय संविधानकर्त्यांनी मागासलेल्या समाजघटकांना इतर समाज घटकाबरोबर बरोबरीने येण्यासाठी काही खास सवलती दिल्या. देशाची वाढत असलेली लोकसंख्या बघता निश्चितच ओबीसी समुहाची लोकसंख्याही त्याच वेगाने वाढत आहे. ओबीसी समुहाच्या जातीय जनगणनेचे अचूक आकडे उपलब्ध नसल्यामुळे ओबीसीचे आरक्षण कमी आहे. ओबीसींच्या विकासासाठी ओबीसींची जातीयनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.
संताजी सेवा सांस्कृतिक मंडळ, कृष्णनगर वर्धाच्यावतीने आयोजीत तेली समाज उप वधु-वर व पालक परिचय मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, माजी खासदार सुरेश वाघमारे, नगराध्यक्ष अतुल तराळे, शेखर शेंडे, प्रविण हिवरे, मिलिंद भेंडे, रविकांत बालपांडे यांची उपस्थिती होती. खा. तडस पुढे म्हणाले, समाज हा नविन विचारांचा आणि तरुणांचा योग्य समन्वय साधुन विकास करु शकतो. ओबीसींच्या समस्या निकाली निघाव्या म्हणून आपण जनगणनेचा विषय संसदेत मांडू असे आश्वास यावेळी त्यांनी दिले. कार्यक्रमादरम्यान सुरेश वाघमारे, माधव चंदनखेडे, गजानन टाके, अशोक लटारे, शेखर शेंडे, प्रविण हिवरे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्तावीक संस्थेचे सचिव हरिष हांडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मोहन सायंकार यानी केले तर आभार शैलेंद्र झाडे यांनी मानले. यशस्वीतेकरिता अतुल पिसे, नितीन साटोणे, सुरेंद्र खोंड, पुष्पा डायगव्हाणे, किशोर गुजरकर, जगन्नाथ लाकडे, चंद्रकांत चामटकर, विनायक तेलरांधे, शोभा तडस, सुधीर चाफले, सचिन सुरकार आदींनी सहकार्य केले.

उल्लेखनीय कार्य करणारे सन्मानित
कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचीत सभापती माधव चंदनखेडे तसेच जेष्ठ नागरिक नामदेव गुजरकर यांना सन्मानित करण्यात आले. तसेच श्रृणानुबंध-२०२० या वधु-वर परिचय पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.

Web Title: Ethnicity based census is needed for the development of OBCs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.