कोविड संकटातही अकरा महिन्यात वर्धा शहरातील मृत्यूसंख्या ‘इन कंट्रोल’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 05:00 AM2020-11-22T05:00:00+5:302020-11-22T05:00:04+5:30

सन २०१८ मध्ये एकूण ९६८ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नाेंद घेण्यात आली होती. त्यावर्षी मे महिन्यात तब्बल ११७ मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. तर यंदाच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत एकूण ६८३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. यंदा सप्टेंबर महिन्यात तब्बल ८९ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. 

Even in the Kovid crisis, the death toll in Wardha city in eleven months is 'in control' | कोविड संकटातही अकरा महिन्यात वर्धा शहरातील मृत्यूसंख्या ‘इन कंट्रोल’च

कोविड संकटातही अकरा महिन्यात वर्धा शहरातील मृत्यूसंख्या ‘इन कंट्रोल’च

Next
ठळक मुद्दे२०१९ मध्ये ९८३ मृत्यूंची नोंद : मे २०१८ मधील मृत्यूचा विक्रम कायम

 लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :  कोरोना संकटाच्या काळात प्रत्येक व्यक्ती स्वत:ला कसे सुरक्षीत ठेवता येईल याचा विचार करीत त्यावर  प्रत्यक्ष कृती करीत असल्याने जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा ब्लास्ट झालेला नाही. इतकेच नव्हे तर २०२० या वर्षात प्रत्येक महिन्याला सरासरी ५० व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद स्थानिक स्वराज्य संस्था आलेल्या वर्धा नगरपालिकेच्या आणि जिल्हा रुग्णालयातील जन्म व मृत्यू विभागाने घेतली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२० या काळात या दोन्ही कार्यालयांनी शहरात ६८३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेतली आहे. यंदाच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक म्हणजे ८९ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे मे २०१८ मध्ये तब्बल ११७ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची विक्रमी नोंद घेण्यात आली होती. परिणामी, कोरोना संकटाच्या काळातही शहरात मृत्यू संख्या नियंत्रणात असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी कोरोनाचे संकट मोठे आणि जीवघेणे असल्याचे वास्तव आहे.

यंदाच्या वर्षी सर्वाधिक मृत्यूसंख्या सप्टेंबरमध्ये
सन २०१८ मध्ये एकूण ९६८ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नाेंद घेण्यात आली होती. त्यावर्षी मे महिन्यात तब्बल ११७ मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. तर यंदाच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत एकूण ६८३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. यंदा सप्टेंबर महिन्यात तब्बल ८९ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. 

वेळीच मिळताेय उपचार
जिल्ह्यात दोन वैद्यकीय महाविद्यालय आहेत. ते विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरत आहे. कोविड संकटाच्या काळात तेथे आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळत आहे. त्यामुळे मृत्यूदर नियंत्रणात आहे.
- प्रवीण बोरकर, 
आराेग्य विभाग प्रमुख, न. प. वर्धा. 
 

Web Title: Even in the Kovid crisis, the death toll in Wardha city in eleven months is 'in control'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.