शेवटी सुरक्षा म्हणून पाडल्या फांद्या, नुकसान टळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 06:00 AM2020-01-04T06:00:00+5:302020-01-04T06:00:07+5:30
महात्मा गांधींनी १९३६ मध्ये पिंपळाचे झाड लावलेले आहे. हे झाड अजस्त्र असून तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण ते महात्मा गांधींनी लावलेले असून आश्रमाच्या स्थापनेपासून आहे. आश्रमाचे कार्यकर्ते आपापल्या कार्यात व्यस्त होते. कटकट असा आवाज यायला लागला. पण तो कोठून येत आहे, हे समजत नव्हते. याची माहिती मार्गदर्शिका संगीता चव्हाण यांनी विभागप्रमुख विजय धुमाळे व शंकर वाणी यांना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : सतर्कतेमुळे अपघात टळला आणि होणारी मोठी हानी टळली. शेवटी पिंपळाच्या फांद्या पाडल्याने सर्वांनाच दिलासा मिळाल्याची घटना प्रसिद्ध महात्मा गांधी आश्रमात गुरूवारी सकाळी घडली.
सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू होता. यामुळे थंडीचा कडाका वाढला. सर्वत्र सामसुम असली तरी महात्मा गांधी आश्रमात पर्यटकांची संख्या मोठी होती. यावेळी शैक्षणिक सहलीचे विद्यार्थीदेखील होते.
महात्मा गांधींनी १९३६ मध्ये पिंपळाचे झाड लावलेले आहे. हे झाड अजस्त्र असून तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण ते महात्मा गांधींनी लावलेले असून आश्रमाच्या स्थापनेपासून आहे. आश्रमाचे कार्यकर्ते आपापल्या कार्यात व्यस्त होते. कटकट असा आवाज यायला लागला. पण तो कोठून येत आहे, हे समजत नव्हते. याची माहिती मार्गदर्शिका संगीता चव्हाण यांनी विभागप्रमुख विजय धुमाळे व शंकर वाणी यांना दिली. तत्काळ याचा शोध घेतला असता तो पिंपळाच्या झाडाच्या एका फांदीचा होता. ती नेमकी बापू कुटीच्या प्रवेशद्वारावर होती. हा भाग महत्त्वाचा आहे. बा-कुटी, बापू कुटी आणि प्रार्थना भूमीजवळ असून याच ठिकाणी पर्यटक आणि विद्यार्थी जाणे-येणे करीत होते.
पाहणी केली असता तो फांदा तुटत असल्याने त्याचा आवाज येत होता. धोक्याची आणि नुकसानीची शक्यता वाढली. तातडीने कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे प्रयत्न सुरू केले. दोर टाकून तो फांदा पाडण्यात आला. यामुळे मोठी हानी टळली आणि आश्रमाचे होणारे नुकसानही टळल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.