ईव्हीएम हटाव, बॅलेट लाओ जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 06:00 AM2019-09-16T06:00:00+5:302019-09-16T06:00:30+5:30

आंदोलनाच्या मंचावरून ईव्हीएम तज्ज्ञ व शास्त्रज्ञ हरिप्रसाद, अनुपम सराफ, रमेश बेलमकोंडा, राहुल मेहता, निरंजन टकले यांनी ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटच्या वापरातून कशाप्रकारे भारतीय जनतेच्या मतांची चोरी केली जाते, हे सप्रमाण दाखवून दिले आहे.

EVM Deletion, Ballet Lao People's Movement | ईव्हीएम हटाव, बॅलेट लाओ जनआंदोलन

ईव्हीएम हटाव, बॅलेट लाओ जनआंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वपक्षीय लोकशाही बचाव अभियानचे एसडीओंना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : महाराष्ट्र विधानसभेची आगामी निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी म्हणून सर्वपक्षीय लोकशाही बचाव अभियान व नागरिकांनी ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव असे नारे देत नषेध केला. निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्य निवडणूक आयुक्त व केंद्रीय निवडणूक आयोग यांना देण्यात आले.
ईव्हीएम हटाव बॅलेट लाओ हे जन आंदोलन संपूर्ण राज्यात पुकारले आहे. या आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र विधानसभेची आगामी निवडणूक ही केवळ मतपत्रिकेवरच घेण्यात यावी.
सर्वपक्षीय लोकशाही बचावच्या वतीने सांगण्यात आले की, लोकांचे दोस्त या संघटनेच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांना लेखी निवेदन देऊन ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर (बॅलेट) मतदान घेण्याची मागणी केली होती. त्याची दखल न घेता लोकसभेच्या निवडणुका या ईव्हीएमद्वारेच घेण्यात आल्या, हा लोकभावनेचा अनादर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले.
मतदानाचा अधिकार दिला. तो ईव्हीएमने हिरावून घेतला गेला आहे. निवडणूक नि:पक्ष होऊ देण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाचीच आहे.
आंदोलनाच्या मंचावरून ईव्हीएम तज्ज्ञ व शास्त्रज्ञ हरिप्रसाद, अनुपम सराफ, रमेश बेलमकोंडा, राहुल मेहता, निरंजन टकले यांनी ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटच्या वापरातून कशाप्रकारे भारतीय जनतेच्या मतांची चोरी केली जाते, हे सप्रमाण दाखवून दिले आहे.
भारतीय मतदार म्हणून ईव्हीएम मशीन कसे ‘टेम्पर’ केले जाते, हे उघड करून दाखवू शकतो, असेही निवेदनात म्हटले आहे. आगामी कोणत्याही निवडणुका बॅलेट पेपरवर होणे आवश्यक आहे. लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर उघड झालेल्या आकडेवारीतील विसंगतीवर अजूनही समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. ईव्हीएमच्या मतदानातील आकडेवारी जुळत नाही. हे संशयास्पद आहे. जर्मनीच्या सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम हे असंविधाानिक असल्याचा निर्णय दिला आहे. ईव्हीएम कसे टेम्पर होऊ शकते, हे जगभरातील तज्ज्ञांनी दाखवले आहे. या विषयावर वादविवाद, चर्चा, कोर्ट-कचेरी न करता विधानसभेच्या निवडणुका बॅलेटवरच घ्याव्यात. अन्यया रोष व्यक्त होण्याची शक्यता आहे.
निवेदनाची योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी शालीक डेहणे, सौरभ तिमांडे, अनिल जवादे, मिर्झा परवेज बेग, गौरव तिमांडे, शकील अहमद, मधुसूदन हरणे, मोहम्मद इक्बाल, जितेंद्र शेजवळ, निखिल वडमअलवार, पंकज चौधरी, लक्ष्मीकांत जवादे, विक्की गिरडे, संजय डोंगरे, कोठेकर, महेश माकडे, दिनेश वाघ, पाटील, संदेश मून यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Web Title: EVM Deletion, Ballet Lao People's Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.