अतिवृष्टीमुळे उत्पादनावर होणार प्रतिकूल परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:49 AM2019-09-17T00:49:30+5:302019-09-17T00:50:08+5:30
जून महिन्यात उशीरा पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड उशीरा केली. त्यातच जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबीन आदी पीक अडचणीत आले आहे. यंदा कपाशीच्या पिकाची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र, अजूनही कपाशीच्या झाडाला बोंड लागण्यापूर्वी फुल व पात्या आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जून महिन्यात उशीरा पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड उशीरा केली. त्यातच जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबीन आदी पीक अडचणीत आले आहे. यंदा कपाशीच्या पिकाची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र, अजूनही कपाशीच्या झाडाला बोंड लागण्यापूर्वी फुल व पात्या आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.
लोकमतने जिल्ह्यातील अनेक गावात जावून यासंदर्भात आढावा घेतला. शेतांमध्ये शेतकऱ्यांची भेट घेवून माहिती जाणून घेतली असता यंदा कपाशीचे झाडे मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे शेतकरी सांगतात. अतिवृष्टीमुळे निंदनाचा खर्चही प्रचंड प्रमाणात वाढला आहे. २५० रूपये रोज एका महिला मजूराला द्यावा लागतो.
मजूर गावातून शेतात आणण्यासाठी व त्यांना सोडून देण्यासाठी ऑटोरिक्षाला प्रति दिवस ३०० रूपये द्यावे लागतात. फवारणीचा खर्चही दरररोज एक हजार रूपयाच्यावर आहे. पºहाटी मोठ्या प्रमाणावर वाढली असली तरी फुल, पाती मात्र आलेली नाही. दिवाळी, दसºयात दरवर्षी कापूस निघतो. यंदा दसºयात किंवा दिवाळीत सितादेवी होणार नाही, अशी माहिती शेतकºयांनी दिली. ग्रामीण भागात मजुरांची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. आता हाताने हॅन्डल मारण्याच्या स्प्रेपंपाने कुणीही फवारणी करायला येत नाही. सर्वांना बॅटरीचा पंप लागतो. तो पंप असेल तरच मजूर कामावर येतात. अन्यथा फवारणीचे काम करण्यास कुणीही तयार नसल्याचे शेतकºयांनी सांगितले. जे शेतकरी स्वत: शेतात उभे राहून फवारणी करून घेतात, त्यांचे काम ठिक आहे. परंतु इतरांच्या भरोशावर फवारणीचे काम करायचे असेल तर मजूर पंपाचा नोझल मोठा करून तासाभरात फवारणीचे काम उरकवतो, अशी माहिती शेतकºयांनी दिली. एकूणच अति पावसामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.
संपूर्ण कुटुंब शेतात
ग्रामीण भागात फिरत असताना अनेक शेतांमध्ये संपूर्ण कुटुंब शेतात काम करीत असल्याचे दिसून आले. यंदा ज्या लोकांनी ठेक्याने व मक्त्याने शेती करण्यासाठी घेतली आहे, त्यांना कदाचित अतिवृष्टीमुळे तोटा येण्याची शक्यता आहे. कारण शेतीचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. तुलनेत उत्पादन होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती शेतकºयांनी दिली.