शिक्षकांच्या बदल्यांनी ‘कही खुशी-कही गम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 11:03 PM2018-05-30T23:03:47+5:302018-05-30T23:04:08+5:30

मागील अनेक महिन्यांपासून रेंगाळत असलेला शिक्षकांच्या बदल्यांचा विषय अखेर मार्गी लागला आहे. वर्धा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जि.प.च्या २५९ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात कुणाला दूरची तर कुणाला जवळची शाळा मिळाल्याने शिक्षकांमध्ये ‘कही खुशी-कही गम’चे वातावरण दिसून आले.

In exchange of teachers, 'some cheerful gum' | शिक्षकांच्या बदल्यांनी ‘कही खुशी-कही गम’

शिक्षकांच्या बदल्यांनी ‘कही खुशी-कही गम’

Next
ठळक मुद्देवर्धा पं.स. अंतर्गत २५९ शिक्षकांचे स्थानांतरण

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील अनेक महिन्यांपासून रेंगाळत असलेला शिक्षकांच्या बदल्यांचा विषय अखेर मार्गी लागला आहे. वर्धा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जि.प.च्या २५९ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात कुणाला दूरची तर कुणाला जवळची शाळा मिळाल्याने शिक्षकांमध्ये ‘कही खुशी-कही गम’चे वातावरण दिसून आले.
वर्धा पंचायत समिती अंतर्गत येणाºया जिल्हा परिषदेच्या २५९ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सदर प्रक्रीया पूर्ण करताना चार प्रवर्ग निश्चित करीत या बदल्या करण्यात आल्या आहेत. पहिल्या प्रवर्गात ५३ वर्षे सेवा देणाºया शिक्षकांसह दिव्यांग तसेच घटस्फोटीत आणि विधवा शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. प्रवर्ग दोनमध्ये पती-पत्नी एकत्रिकरणाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी ३० किमी अंतरावरील शिक्षक व शिक्षकांची बदली करण्यात आली आहे. प्रवर्ग तीनमध्ये अवघड क्षेत्रातील शिक्षकांची बदली करण्यात आली आहे तर प्रवर्ग चारमध्ये दहा वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांची बदली करण्यात आली आहे. बुधवारी ज्या शिक्षकांच्या बदल्या वर्धा पं.स.च्या बाहेर झाल्या त्यांना कार्यमुक्त करण्यात आले तर ज्यांची बदली इतर पं.स. मधून वर्धा पं.स. मध्ये येणाºया जि.प. शाळांमध्ये झाली, त्यांना रूजू करून घेण्याची प्रक्रीया पं.स. शिक्षण विभागात पूर्ण करण्यात आली. यामुळे शिक्षकांनी वर्धा पं.स.च्या आवारात एकच गर्दी केली होती.
शिक्षकांची धावा-धाव
वर्धा पंचायत समितीच्या कार्यक्षेत्राबाहेर बदली करण्यात आलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणे तथा वर्धा पं.स. अंतर्गत येणाºया जि.प. शाळांमध्ये बदली झालेल्या शिक्षकांना रूजू करून घेण्याची प्रक्रीया बुधवारी पूर्ण करून घेण्यात आली. यासाठी वर्धा पं.स.च्या आवारात शिक्षकांची एकच गर्दी झाली होती. छोट्या-छोट्या त्रूटींची पुर्तता करण्यासाठी शिक्षक धावाधाव करताना दिसून आले.

Web Title: In exchange of teachers, 'some cheerful gum'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.