खळबळजनक! शाळेसमोरून बालिकेचे अपहरण; धावत्या गाडीत केला अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2022 09:51 PM2022-08-23T21:51:43+5:302022-08-23T21:53:20+5:30

Wardha News शाळेत जात असताना एका बालिकेचे दोघा नराधमांनी चाकूचा धाक दाखवून अपहरण करीत तिला कारमध्ये बसवून धावत्या गाडीत लैंगिक अत्याचार केले. ही घटना पुलगाव शहरात घडली.

Exciting! Kidnapping of a girl in front of a school; Atrocities committed in a moving car | खळबळजनक! शाळेसमोरून बालिकेचे अपहरण; धावत्या गाडीत केला अत्याचार

खळबळजनक! शाळेसमोरून बालिकेचे अपहरण; धावत्या गाडीत केला अत्याचार

Next
ठळक मुद्देचाकूचा धाक दाखवत बसविले गाडीतमुख्य आरोपी अटकेत

वर्धा : शाळेत जात असताना एका बालिकेचे दोघा नराधमांनी चाकूचा धाक दाखवून अपहरण करीत तिला कारमध्ये बसवून धावत्या गाडीत लैंगिक अत्याचार केले. ही घटना पुलगाव शहरात घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, समाजमन सुन्न झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी मुख्य आरोपी सुमेध मेश्राम याला मंगळवारी रात्री अटक केली.

पोलिसांनी २२ ऑगस्ट रोजी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पीडिता शाळेत जात असताना तिला सुमेध नामक युवक आणि एका अनोळखी युवकाने आवाज दिला. ती शाळेसमोरील प्रवेशद्वाराजवळ थांबली असता, आरोपी नराधम सुमेध याने चाकूचा धाक दाखवून तिला चारचाकी वाहनात जबरदस्ती खेचत बसवले. पीडिता आरडाओरड करीत होती; पण कारच्या काचा बंद होत्या. सुमेधने पीडितेवर धावत्या कारमध्येच बळजबरी अत्याचार केला, तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. मात्र, पीडितेने सर्व आपबीती तिच्या घरच्यांना सांगितली असता, घरच्यांनी थेट पुलगाव पोलीस ठाणे गाठले. पीडितेच्या आईने सुमेध आणि त्याच्या एका मित्राविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी सुमेधच्या फरार मित्राचा शोध चालविला आहे.

नराधम पोलिसांच्या ‘रडार’वर

या लज्जास्पद घटनेबद्दल सर्व स्तरातून संताप व्यक्त होत असून, पोलिसांनीही तत्काळ दखल घेत आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना केले आहे. लवकरच अन्य आरोपीच्या मुसक्या आवळू, अशी माहिती पुलगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश शेळके यांनी दिली.

Web Title: Exciting! Kidnapping of a girl in front of a school; Atrocities committed in a moving car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.