Lok Sabha Election 2019; काँग्रेसला गांधी जिल्ह्यातून हद्दपार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 11:21 PM2019-04-06T23:21:19+5:302019-04-06T23:23:05+5:30

मागील ५० वर्षांत काँग्रेस सरकारच्या राजवटीत शेतकऱ्यांची दैनीय अवस्था झाली. काँग्रेस सत्तेवर असताना त्यांना शेतकऱ्यांची चिंता नव्हती. आता निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खोटे वचन देण्याचे काम काँग्रेस करत आहे.

Execution of Congress from Gandhi district | Lok Sabha Election 2019; काँग्रेसला गांधी जिल्ह्यातून हद्दपार करा

Lok Sabha Election 2019; काँग्रेसला गांधी जिल्ह्यातून हद्दपार करा

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणी/ वायगांव/ कारंजा (घा.) :
मागील ५० वर्षांत काँग्रेस सरकारच्या राजवटीत शेतकऱ्यांची दैनीय अवस्था झाली. काँग्रेस सत्तेवर असताना त्यांना शेतकऱ्यांची चिंता नव्हती. आता निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खोटे वचन देण्याचे काम काँग्रेस करत आहे. या काँग्रेसला गांधी जिल्ह्यातून लोकसभा निवडणुकीत हद्दपार करा, असे आवाहन राज्याचे अर्थ व नियोजन तथा वनमंत्री तसेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस यांच्या निवडणुक प्रचारार्थ सेलू तालुक्यातील हिंगणी, वर्धा तालुक्यातील वायगाव (नि.) व कारंजा (घाडगे) येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मोदीजींच्या नेतृत्वात सरकारने २०२२ पर्यंतच्या योजना आखल्या आहेत. प्रत्येक गरीबाला घर दिले जाणार आहे, असे त्यांनी वायगाव येथे सभेत सांगितले.
वायगाव येथील सभेला शिवसेना जिल्हा प्रमुख बाळा शहागडकर, राजेश सराफ, रिपाईचे जिल्हाध्यक्ष विजय आगलावे, किरण उरकांदे, रमेश वाळके, संजय गाते, अनंत देशमुख, माजी खासदार सुरेश वाघमारे, डॉ. शिरीष गोडे, जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, प्रशांत इंगळे तिगावकर, गुंडू कावळे, वायगावचे सरपंच प्रवीण काटकर, मिलिंद भेंडे, किशोर गावळकर उपस्थित होते. हिंगणी येथील सभेला आ. डॉ. पंकज भोयर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक हिंगणीच्या सरपंच शुभांगी मुडे यांनी केले. या सभेला मारोतराव मुडे, सोनाली कलोडे, अशोक कलोडे, जि. प. सदस्य राणा रणनवरे, विलास वरटकर, योगेश रणनवरे, योगेश इखार, नरहरी चहांदे, अशोक मुडे, कुंदा खडगी, संजय अवचट, सुनीता ढवळे, नूतन राऊत आदींची उपस्थिती होती.

वन्यजीवांनी शेतीच्या केलेल्या नुकसानाला भरीव शासकीय मदत देणार - मुनगंटीवार
कारंजा (घा.) - येथील जाहीर सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी जंगली श्वापदाकडून शेतीच्या होणाºया नुकसानीला जास्त मदत देण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात निर्णय घेतल्या जाणार आहे. कारंजा तालुक्याच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले. या सभेला उमेदवार रामदास तडस, माजी आमदार दादाराव केचे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी मोरेश्वर भांगे, रेवता धोटे, निता गजाम, सरिता गाखरे, रंजना टिपले, मुकूंदा बारंगे, वसंत भांगे, जि. प. उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, सुरेश खवशी, गौरीशंकर अग्रवाल, शिरीष भांगे, हरिभाऊ धोटे, चेतना मानमोडे आदींची उपस्थिती होती. संचालन दिलीप जसुटकर यांनी केले.

Web Title: Execution of Congress from Gandhi district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.