प्राथमिक शिक्षक संघाच्या वर्धा तालुका कार्यकारिणीचा विस्तार
By Admin | Published: September 3, 2016 12:17 AM2016-09-03T00:17:12+5:302016-09-03T00:17:12+5:30
शिक्षक नेते शिवाजीराव पाटील प्रणित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वर्धा तालुका शाखेच्या कार्यकारीणीचा विस्तार करण्यात आला.
सुनील कोल्हे अध्यक्ष, चंद्रशेखर वैद्य सरचिटणीस
वर्धा : शिक्षक नेते शिवाजीराव पाटील प्रणित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वर्धा तालुका शाखेच्या कार्यकारीणीचा विस्तार करण्यात आला. वर्धा येथे पार पडलेल्या सभेमध्ये जंबो कार्यकारीणी सर्व सभासदांच्या सर्व संमतीने निवड करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघाचे कोषाध्यक्ष तथा जि.प. शिक्षण समितीचे निमंत्रित सदस्य वसंत बोडखे होते. यावेळी अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष लोमेश वऱ्हाडे, वर्धा विभाग अध्यक्ष कृष्णा देवकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेश वालोकर यांची उपस्थिती होती. सध्या संघाची सदस्य संख्या वाढत असल्याने तालुका शिक्षक संघाच्या प्रत्येक तालुक्यातील संघाचा विस्तार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे सभेमध्ये वर्धा तालुका शिक्षक संघाची कार्यकारीणी सर्वानुमते निवडण्यात आली.
वर्धा शाखेचे तालुका अध्यक्ष म्हणून सुनील कोल्हे यांची वर्णी लागली. सरचिटणीस म्हणून चंद्रशेखर वैद्य, कार्याध्यक्ष शंकर येरेकर, कोषाध्यक्ष संतोष डाखोळे, उपाध्यक्ष गंगाधर कासेकर, संतोष चांदेकर, प्रसिद्ध प्रमुख प्रफुल गर्गे, महिला आघाडी अध्यक्ष प्रतिभा धमाने, संघटक रविकांत वहारे, प्रभाकर तुरक, विद्या वालोकर, मिनाक्षी गणवीर, ज्येष्ठ सल्लागार साहेबराव राऊत, जिल्हा प्रतिनिधी म्हणून नरेश ढोके यांची निवड करण्यात आल्याची माहिती संघाच्यावतीने देण्यात आली.
केंद्र प्रतिनिधी सेवाग्राम विजय बाळसराफ, संगीता खातदेव, मदनी विनोद गोडे, रिमानक हुलके, बोरगाव उल्हास शेळके, यशोदा निळे, वायगाव रमेश राठोड, मेघा उमाटे, झाडगाव भालेराव ठाकरे, स्मिता जवंजवार, वायफड सविता भोयर, संगीता कडू, दिलीप भोवरे, नालवाडी गजानन पोटे, सिमा राठोड, शितल वडनेरकर, आंजी शंकर जगणे, निता काळसर्पे यांची निवड झाली. निवड प्रक्रियेनंतर प्रभाकर तुरक यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी नव्या पदाधिकाऱ्याना कामाबाबात मार्गदर्शन करण्यात आले.(प्रतिनिधी)