वन्यप्राण्यांच्या तृष्णेवर महिन्याकाठी ३० हजारांचा खर्च

By admin | Published: March 21, 2016 01:50 AM2016-03-21T01:50:47+5:302016-03-21T01:50:47+5:30

वनसंपन्न जिल्ह्यात विविध प्रजातीच्या वन्य प्राण्यांचे वास्तव्य आढळते. दुर्मिळ पक्षी, प्राण्यांची नोंद जिल्ह्यातील वनात झाली

The expenditure on wild animals is Rs 30,000 per month | वन्यप्राण्यांच्या तृष्णेवर महिन्याकाठी ३० हजारांचा खर्च

वन्यप्राण्यांच्या तृष्णेवर महिन्याकाठी ३० हजारांचा खर्च

Next

प्रशांत हेलोंडे ल्ल वर्धा
वनसंपन्न जिल्ह्यात विविध प्रजातीच्या वन्य प्राण्यांचे वास्तव्य आढळते. दुर्मिळ पक्षी, प्राण्यांची नोंद जिल्ह्यातील वनात झाली आहे. प्राण्यांची संख्या लक्षात घेऊनच सेलू तालुक्यातील बोर अभयारण्याला ‘व्याघ्र प्रकल्प’ घोषित करण्यात आले. या व्याघ्र प्रकल्पातील प्राण्यांना उन्हाळ्यात टँकरच्या पाण्याचाच आधार असल्याचे दिसते. येथील कृत्रिम पाणवठ्याजवळ पाण्याची सोय नसल्याने एक हजार रुपये प्रतिदिन खर्च करीत टँकरने पाणी टाकावे लागत आहे.
सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या वन समृद्धीत भर पडली आहे. जुने व नवीन बोर असा विस्तीर्ण पसरलेला हा व्याघ्र प्रकल्प प्राण्यांसाठी सुरक्षित स्थळ म्हणून मान्यताप्राप्त आहे; पण जंगलातील पाणवठ्यांच्या कमतरतांमुळे शेजारच्या गावांना प्राण्यांचा उपद्रव सहन करावा लागतो, हे वास्तव आहे. बोरमध्ये गस्तीकरिता ८५ किमी तर पर्यटनासाठी ४३ किमीचे रस्ते आहेत. जंगलात जंगलातील आगीवर लक्ष ठेवण्यासाठी पाच ‘वॉच टॉवर’ आहे. पाच संरक्षण कुटीवर ‘वायरलेस सेट’ लावले आहे. येथे २४ तास वन कर्मचारी तैनात राहून दिवसरात्र गस्त घालतात.


पर्यटकांची होतेय आबाळ
४बोर व्याघ्र प्रकल्पात दररोज शेकडो पर्यटक हजेरी लावतात. येथील तोकड्या सुविधांमुळे त्यांची आबाळ होते. हरिण, चितळ, मोर, लांडगे, कोल्हे, माकड, निलगायी, सांबर आणि वाघांचे दर्शन होत असले तरी असुविधा कायम आहे.
प्रशिक्षित गाईड
४नागपूर, चंद्रपूर, अमरावती येथील प्रशिक्षित गाईड माहिती देण्यासाठी उपलब्ध आहेत. ते पर्यटकांना बोर अभयारण्य व प्राण्यांची माहिती देतात. असे असले तरी व्याघ्र प्रकल्प म्हणून अनेक उणीवा येथे आहेत़ त्या दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे़

सौर ऊर्जेवरील हातपंप गरजेचे
४बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये सौर ऊर्जेवर चालणारे हातपंप बसविले आहेत. त्यांच्या शेजारी पाणवठे तयार करण्यात आले. त्यांची संख्या कमी आहे. असे हातपंप व पाणवठे जुन्या व नवीन बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये तयार करणे गरजेचे झाले आहे.

कृत्रिम पाणवठ्यांजवळ विंधन विहीर करून पाहिल्या; पण २०० फुटापर्यंत पाणीच लागले नाही. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत वन्य प्राण्यांची तृष्णा भागविण्याकरिता टँकरने पाणी आणून ते पाणवठ्यांत टाकण्याशिवाय पर्याय नाही. जुन्या व नवीन बोरमध्ये नऊ सोलर पॅनलयुक्त हातपंप असलेले पाणवठे असून आणखी तीन निर्माण करण्यात येणार आहे. बोरधरणातून पाणी जंगलात पोहोचविण्यावरही विचार केला जाणार आहे.
- रूपाली भिंगारे (सावंत), वनपरिक्षेत्र अधिकारी, नवीन बोर व्याघ्र प्रकल्प, बोरधरण

Web Title: The expenditure on wild animals is Rs 30,000 per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.