लग्नाचे आमिष देत वारंवार अत्याचार नंतर टाळाटाळ, अल्पयवीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

By चैतन्य जोशी | Published: April 5, 2023 04:15 PM2023-04-05T16:15:49+5:302023-04-05T16:16:17+5:30

लग्नास नकार दिल्याने उचलले टोकाचे पाऊल : हिंगणघाट शहरात उडाली खळबळ

Exploitation of minor girl; Attempted suicide by consuming poison | लग्नाचे आमिष देत वारंवार अत्याचार नंतर टाळाटाळ, अल्पयवीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

लग्नाचे आमिष देत वारंवार अत्याचार नंतर टाळाटाळ, अल्पयवीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

googlenewsNext

वर्धा : अल्पवयीन मुलीशी जवळकी निर्माण करुन तिला लग्नाचे आमिष देत एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. वारंवार तिचे लैंगिक शोषण केले. मात्र, आरोपीने लग्नास नकार दिल्याने पीडितेने चक्क उंदीर मारण्याचे औषध खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने सर्व प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला असता हिंगणघाट पोलिस ठाणे गाठून याबाबतची तक्रार ४ रोजी दाखल करण्यात आली. हिंगणघाट पोलिसांनी आरोपीविरुद्ध अत्याचाराच्या तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून त्याच्या शोधार्थ पथक रवाना झाल्याची माहिती दिली.

प्राप्त माहितीनुसार, १७ वर्षीय पीडितेची ओळख आरोपी सोनू रा. तेलंगखेडी याच्याशी झाली. दोघांत मैत्री झाली. अन् मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पीडितेचा १० जानेवारी २्०२३ रोजी वाढदिवस असल्याने पीडितेला आरोपी सोनूने वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने एका शाळेजवळ बोलाविले. पीडिता शाळेजवळ गेली असता आरोपीने तिला दुचाकीवर बसवून येणोरा रस्त्यावर असलेल्या एका लॉजवर नेत लग्नाचे आमिष देत तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. इतकेच नव्हे तर ११ मार्च रोजी आरोपीने स्वत:च्या घरी नेत पुन्हा अत्याचार केला. मात्र, त्यानंतर आरोपीने पीडितेशी बोलणे सोडले. तिचा फोन उचलणे बंद केले.

पीडितेने त्याच्या घरी जात विचारणा केली असता आरोपीने आता मला तुझ्याशी संबध ठेवायचे नाही, असे म्हटले. दरम्यान रागाच्या भरात पीडितेने राहत्या घरीच उंदीर मारण्याचे औषध प्राशन करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पीडितेच्या आईला ही बाब माहिती पडताच त्यांनी तत्काळ सेवाग्राम येथील रुग्णालयात पीडितेला दाखल करुन उपचार सुरु केले. पीडितेच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

इन्स्टाग्रामवर ओळख अन् झाला घात...

पीडितेची ओळखी आरोपी सोनूसोबत इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईटवर झाली. दोघांची एकमेकाशी मैत्री झाले. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, सोशल मीडिया साईटवरुन झालेल्या ओळखीने पीडितेचा घात केला. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी सोशल मीडियावर ओळख करु नये, त्याला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Web Title: Exploitation of minor girl; Attempted suicide by consuming poison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.