शासकीय योजनांचा लाभ गरजुंपर्यंत पोहोचवा
By admin | Published: June 8, 2017 02:37 AM2017-06-08T02:37:15+5:302017-06-08T02:37:15+5:30
ग्रामीण भागातील शेवटच्या गरजुंला शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. विविध
समीर कुणावार : प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत गॅस कनेक्शन वितरण सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : ग्रामीण भागातील शेवटच्या गरजुंला शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. विविध योजनांची माहिती घराघरापर्यंत कशी पोहोचविता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे आवाहन केले आहे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजुंना देण्याच्या कामाला प्राधान्यक्रम द्यावा, असे प्रतिपादन आमदार समीर कुणावार यांनी केले.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन वितरण कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून गॅस कनेक्शन वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. प्रमुख अतिथी म्हणून नगर पंचायतचे सभापती गजानन राऊत, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. मेघश्याम ढाकरे, वंजारी समाजाचे धामत, शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख डॉ. हेमंत इसनकर, प्रा. केदार, पुरवठा निरीक्षक अजय साबळे, नगरसेवक मधुकर कामडी, येंडे, जोत्स्रा कामडी, अनिल कामडी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान बिपीएल धारकांना केवळ १०० रुपयांत गॅस कनेक्शन उपलब्ध करून देत त्याचे वितरण करण्यात आले. आतापर्यंत ८०० जणांना गॅस कनेक्शन वितरीत केल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सौरभ कामडी, अशोक कामडी, शबिना शेख, स्वाती वैद्य, रोशन कुत्तरमारे, अनिरूद्ध मुन, चंद्रशेखर कडवे, प्रदीप पाटील आदींनी सहकार्य केले.