एसटी बसगाड्यांचे व्यापक निर्जंतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 06:00 AM2020-03-21T06:00:00+5:302020-03-21T06:00:11+5:30

जिल्ह्यात वर्धा, आर्वी, हिंगणघाट, पुलगाव व तळेगाव हे रापमचे पाच आगार आहेत. या पाचही आगारात एकूण २५० बसेस आहेत. याच बसेस ग्रामीण आणि शहरी प्रवााशांच्या सेवेसाठी प्रभावी नियोजन करून सोडल्या जातात. वर्धा जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसला तरी यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळला आहे.

Extensive sterilization of ST buses | एसटी बसगाड्यांचे व्यापक निर्जंतुकीकरण

एसटी बसगाड्यांचे व्यापक निर्जंतुकीकरण

Next
ठळक मुद्देसंख्येत मोठी कपात : कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना (कोव्हिड-१९) या विषाणूचा वर्धा जिल्ह्यात कुठल्याही परिस्थितीत प्रसार होऊ नये म्हणून शासन व प्रशासनस्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वर्धा जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाची प्रत्येक बस निर्जंतूक करण्यात येत आहे. असे असले तरी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा तसेच बसस्थानकावर गर्दी करू नये असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
जिल्ह्यात वर्धा, आर्वी, हिंगणघाट, पुलगाव व तळेगाव हे रापमचे पाच आगार आहेत. या पाचही आगारात एकूण २५० बसेस आहेत. याच बसेस ग्रामीण आणि शहरी प्रवााशांच्या सेवेसाठी प्रभावी नियोजन करून सोडल्या जातात. वर्धा जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसला तरी यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे वर्ध्याकरांमध्ये पूर्वीच भीतीचे वातावरण आहे. हेच भीतीचे वातावरण निवळावे आणि कुठल्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रसार वर्धा जिल्ह्यात होऊ नये म्हणून संपूर्ण बसेस निर्जंतूक करण्यात येत आहेत.
बसस्थानकात गर्दी होऊ नये म्हणून फलाटावर प्रवासी असल्यास बसेस सोडल्या जात आहेत. तर प्रवासी नसल्यास बसफेरीच रद्द केली जात आहे. गुरूवारी राज्य परिवहन महामंडळाने कोरोना संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन तब्बल ५० बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी सोडल्या नाहीत, असे राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

वाहक, चालकांसाठी मुबलक ‘मास्क’
कोरोनाची लागण रापमच्या वाहक व चालकांना होऊ नये म्हणून त्यांना मास्क दिले जात आहे. वरिष्ठांकडे मागणी केल्यानंतर रापमच्या कर्मचाºयांसाठी मुबलक प्रमाणात मास्क उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर प्रत्येक बस निर्जंतूक करण्यासाठी जिल्ह्यातील पाचही आगारात अतिरिक्त मनुष्यबळही लावण्यात आले आहे.

नागरिकांनी कोरोनाला घाबरून न जाता त्याबाबतची खबरदारी घेणे गरजेचे आहे. इतकेच नव्हे तर विनाकारण प्रवास टाळवा तसेच बसस्थानकांवर गर्दी करू नये. रापमच्या कर्मचाºयांसाठी मुबलक प्रमाणात मास्क उपलब्ध झाले आहेत. शिवाय बसेस निर्जंतूक करण्यात येत आहेत.
- चेतन हासबनीस, विभाय नियंत्रक, रापम, वर्धा.

Web Title: Extensive sterilization of ST buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.