तणनाशकाच्या अतिवापराने रानभाज्या होताहेत नामशेष

By admin | Published: September 29, 2014 12:50 AM2014-09-29T00:50:25+5:302014-09-29T00:50:25+5:30

पावसाळ्यात सर्वत्र शेताच्या बांधावर अनेक रानभाज्या उगवतात. आधी या भाज्या मोठ्या प्रमाणात बांधावर पहावयास मिळायच्या. परंतु या काही वर्षांमध्ये तननाशकाचा वापर वाढल्याने

Extinction of weedicide is excessive | तणनाशकाच्या अतिवापराने रानभाज्या होताहेत नामशेष

तणनाशकाच्या अतिवापराने रानभाज्या होताहेत नामशेष

Next

वायगाव (नि.) : पावसाळ्यात सर्वत्र शेताच्या बांधावर अनेक रानभाज्या उगवतात. आधी या भाज्या मोठ्या प्रमाणात बांधावर पहावयास मिळायच्या. परंतु या काही वर्षांमध्ये तननाशकाचा वापर वाढल्याने हेत्या काही वर्षात रानभाज्या नामशेष होतात की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे तननाशकाचा अतिवापर करणे ताळण्याची गरज निर्माण झाली आहे.
रानभाज्या म्हणजे गरीब शेतमजूर शेतकऱ्यांचा रानमेवा. परंतु हा रानमेवा आता तणनाशकाच्या अतिवापरामुळे नामशेष होत असून पावसाळ्यात या भाज्याची चव चाखणाऱ्यांच्या जेवणाची लज्जत नाहीशी होत आहे. पूर्वी पावसाच्या आगमनाने शेतातील मातीच्या सुगंधाने मन प्रसन्न तर होतच होते. त्याचबरोबर या शेतावर तरोटा, अंबाडी, चाकवत, चिवळी, लाल माठ, कटवल अशा अनेक भाज्या शेतातील बांधावर आपोआप उगवायच्या. त्यामुळे आता जानवत असलेली महागाई तेव्हा तितक्या प्रकर्षाने जानवत नव्हती. पावसाळा व्व अर्धा हिवाळा या भाज्यांवर निभून जायचा, शेतकऱ्यांबरोबरच शेतमजुरांसाठीही या रानभाज्या वरदान असायच्या. या शेतमजूर महिला शेतावरून घरी येत असताना या भाज्या तोडून आणायच्या. त्यामुळे दोन वेळच्या भाजीची सोय व्हायची. शहरात रहात असलेल्या अनेकांना आजही या भाज्या आठवतात. आगऊ पैसे देऊन त्या विकत घेतल्या जातात.
परंतु गेल्या दशकात शेती करायच्या पद्धतीत भरपूर बदल झाले आहे. शेतीच्या गरजा वाढल्या. पिकासोबत येणारे तण काढून टाकण्यासाठी निंदणाची गरज असते. आणि त्याकरिता मजुरांची अत्यंत निकड असते. आजघडीला मजूर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे वैज्ञानिकांनी तणनाशकाचा शोध लावला. मजुरी वाढल्याने शेतकरी नाईलाजाने अशा औषधांचा वारंवार वापर करीत आहे. यामुळे शेतात बांधावर उगवणाऱ्या चवळी, कुंदराची भाजी, करडकोसळी, अंबाडी, तरोटा, काटवल, वाघाटे आदी रानभाज्या नामशेष झाल्या आहे.
कृषी क्षेत्रात होत असलेल्या नवनवीन संशोधनामुळे अनेक जुने गावरान वाणही नष्ट होत आहे. शेतात उगवणाऱ्या तरोट्याची जागा आता गाजरगवताने घेतली आहे. तणनाशकाच्या वापराचे दुष्परिणाम समोर येत असले तरी शेतकऱ्यांना दुसऱ्या पर्याय नसल्याने शेतकरी तणनाशकाचा सर्रास वापर करीत आहे. यामुळे पणाबरोबर रानभाज्याही वाळून जात आहे.(वार्ताहर)

Web Title: Extinction of weedicide is excessive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.