रिक्त पदांमुळे परिचारिकांवर अतिरिक्त सेवेचा ताण
By admin | Published: May 12, 2016 02:22 AM2016-05-12T02:22:08+5:302016-05-12T02:22:08+5:30
रुग्णांची सुश्रूषा करणे व पर्यायाने रुग्णसेवेची जबाबदारी समर्थपणे पेलणारी व्यक्ती म्हणून परिचारिकेकडे पाहिले जाते
५४ पदांना शासकीय मंजुरी : भरती प्रक्रियेला न्यायालयाचा थांबा
वर्धा : रुग्णांची सुश्रूषा करणे व पर्यायाने रुग्णसेवेची जबाबदारी समर्थपणे पेलणारी व्यक्ती म्हणून परिचारिकेकडे पाहिले जाते; पण जिल्ह्यातील आरोग्य सेवेत कार्यरत परिचारिकांवर रिक्त पदांमुळे कामाचा ताण वाढत असल्याचे चित्र आहे. शासनाने आणखी ५४ पदे मंजूर केली; पण भरती प्रक्रियेवर न्यायालयाचा थांबा आहे. परिणामी, परिचारिकांना आठवड्यात ४० तासांपेक्षा अधिक वेळ सेवा द्यावी लागत असल्याचे दिसते.
जिल्ह्यात एक जिल्हा सामान्य रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालये, सात ग्रामीण रुग्णालये व २७ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून शासकीय मोफत रुग्णसेवा पूरविली जाते. रुग्णसेवेमध्ये डॉक्टरनंतर महत्त्वाची जबाबदारी परिचारिकांना पार पाडावी लागते. जि.प. आरोग्य विभागांतर्गत जिल्ह्यात १८१ पदे मंजूर आहेत.
जिल्ह्यात १५ पदांचा ‘पॅटर्न’
वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना १५ पदांचा पॅटर्न देण्यात आलेला आहे. यात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह एक परिचारिका व अन्य पदे मंजूर आहेत. यानुसार जिल्ह्यातील पदे भरलेली आहेत. स्वास्थ अभ्यांगता हे पद परिचारिकांना सहकार्य करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले आहे. ही पदे काही प्रमाणात रिक्त आहेत.
परिचारिकांची ३५ पदे रिक्त आहेत. बंधपत्रित पदाकरिता २० पदे राखीव आहेत. या पदांवर २४ उमेदवारांनी दावा करीत न्यायालयात दाद मागितली. परिणामी, पदभरती प्रक्रियेवर स्टे देण्यात आला आहे. यामुळे पदे रिक्त आहेत.