वर्धा जिल्ह्यात वादळाने पपई व केळींचे अतोनात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 12:05 PM2021-06-10T12:05:39+5:302021-06-10T12:06:03+5:30
Wardha News झडशी तालुक्यातील अंतरगाव परिसरात मौजा कामठी व हिवरा शिवारात मंगळवार व बुधवारी आलेल्या वादळी पावसाने पपई व केळींच्या बागांचे अतोनात नुकसान केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: झडशी तालुक्यातील अंतरगाव परिसरात मौजा कामठी व हिवरा शिवारात मंगळवार व बुधवारी आलेल्या वादळी पावसाने पपई व केळींच्या बागांचे अतोनात नुकसान केले आहे.
हिवरा कामठी शिवारात दुपारी दोनच्या सुमारास सोसाट्याचा वारा व पावसाने हजेरी लावली. मृग नक्षत्राचा पहिलाच पाऊस वादळ व वाऱ्यासह कोसळला. या वादळात शेतातील पपईच्या झाडांवरून पडून पपयांचा खच जमिनीवर साचला होता. तसेच केळीचे खांबही आडवे झाले होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अंतरगाव येथील शेतकरी राजू लटारे यांची पपईची बाग उध्वस्त झाली. तर योगेश सोमनकर व कलावती उडान यांच्यासह अन्य शेतकºयांचे गोठे जमीनदोस्त झाले आहेत.