बºहाणपूर जिलेबी सेंटरचा कारखाना सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 11:36 PM2017-08-29T23:36:52+5:302017-08-29T23:37:08+5:30
शहरातील बºहाणपूर जिलेबी सेंटरच्या कारखान्यात घाणीत खाद्यान्न तयार केले जात होते. या कारखान्यावर अन्न व औषधी प्रशासन विभागने मंगळवारी दुपारी धाड टाकली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील बºहाणपूर जिलेबी सेंटरच्या कारखान्यात घाणीत खाद्यान्न तयार केले जात होते. या कारखान्यावर अन्न व औषधी प्रशासन विभागने मंगळवारी दुपारी धाड टाकली. यावेळी तेथे घाणीचे साम्राज्य आढळून आले. यावरून अधिकाºयांनी कारखाना मालक पितांबर नानकराम मनोजा याचा सदर कारखाना बंद केला.
मुख्य मार्गावर चिराग बेकरी समोरील लालू कृपलानी यांच्या घरी बºहाणपूर जिलेबी सेंटर खाद्य पदार्थ तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात गलिच्छ जागेत समोसा, कचोरी आदी खाद्यान्न तयार करून ते बाजारपेठेत बºहाणपूर जिलेबी सेंटरवर विक्रीकरिता ठेवले जात होते. या दुकानात इतर दुकानांच्या तुलनेत खाद्य पदार्थ कमी दराने विकले जात असल्याने नेहमीच गर्दी राहते; पण विक्रीला ठेवलेले खाद्यपदार्थ अस्वच्छ जागेत तयार होत असल्याचे अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या कारवाईत पूढे आले. यावरून सदर कारखाना बंद करण्यात आला. कारखान्याजवळील विहिरीत मोठ्या प्रमाणात कचरा असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. कारखाना मालकाने अन्न व औषधी प्रशासनाकडून कुठलाही परवाना घेतला नसल्याचे पाहणीत समोर आले. अन्नपदार्थ तयार करणे, साठविणे यासाठी निश्चित जागा, परवाना नोंदणी अट क्र. १० चे उल्लंघन व परिशिष्ट चार भाग १ मधील मुद्दा एकचे उल्लंघन तसेच परिशिष्ट चार भाग २ मधील मुद्दा क्र. २.६ चे उल्लंघन करणारे तथा अन्य त्रूट्या आढळून आल्या. यामुळे हा खाद्यपदार्थ तयार करण्याचा कारखाना अधिकाºयांनी बंद केला. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी ललित सोयाम व रवीराज धाबर्डे यांनी केली.