कारखान्यातील धुराचे नियोजन व्हावे
By admin | Published: March 13, 2016 02:27 AM2016-03-13T02:27:32+5:302016-03-13T02:27:32+5:30
औद्योगिक वसाहतीतील कारखान्यामुळे शहराचा नावलौकिक होत आहे. बेरोजगारांच्या हातांना काम मिळत आहे; पण कारखाना प्रशासनाच्या नियोजनाअभावी प्रदूषण वाढत आहे.
रामदास तडस : ‘नो व्हेईकल डे’निमित्त विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
देवळी : औद्योगिक वसाहतीतील कारखान्यामुळे शहराचा नावलौकिक होत आहे. बेरोजगारांच्या हातांना काम मिळत आहे; पण कारखाना प्रशासनाच्या नियोजनाअभावी प्रदूषण वाढत आहे. कारखान्यातून निघणारा धूर उंच आकाशात सोडून नियोजन करणे गरजेचे झाले आहे, असे मत खासदार तडस यांनी व्यक्त केले.
‘नो व्हेईकल डे’ निमित्त शनिवारी खा. रामदास तडस यांच्या नेतृत्वात सायकल रॅली काढण्यात आली. याप्रसंगी दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करून जनजागृती करण्यात आली. रॅलीचा समारोप स्थानिक राजीव गांधी माध्यमिक विद्यालय व मारीया कॉन्व्हेंटच्या प्रांगणात करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ख. तडस तर अतिथी म्हूणन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.एम. दिदावत, संस्थेचे प्रमुख हाजी अब्दुल हमीद आदी उपस्थित होते. सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. खा. तडस पूढे म्हणाले की, येत्या १५ तारखेला दिल्ली येथील खासदार निवासापासून संसद भवनापर्यंत सायकल चालवून ‘नो व्हेईकल डे’चे महत्त्व पटवून देणार आहे.
सुदृढ समाजव्यवस्थेसाठी वाढते प्रदूषण धोकादायक आहे. विद्यार्थ्यांची प्रतिकार शक्ती दिवसेंदिवस कमी होती असल्याची गंभीर समस्या निर्माण होत आहे, असे मत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिदावत यांनी व्यक्त केले. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आमचे प्रयत्न राहील. समाजाचे स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी जनजागृती करण्यात येईल. वाहनाचा वापर कमी करून सायकलचा उपयोग करण्यात येईल, अशाप्रकारची शपथ उपस्थित विद्यार्थ्यांना तसेच समाज सेवकांना देण्यात आली.
शाळेत आलेल्या प्रत्येक सायकलस्वारांचे स्वागत मुख्याध्यापक अनिल तडस यांनी केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष जब्बार तवर, आशिष ईटनकर, प्राचार्य शामीना सैय्यद, मोहम्मद रिजवान, डॉ. श्रावण साखरकर, महालक्ष्मीचे प्रकाश दुधकोहळे, अमर मुरार, शोतोकॉन कराटेचे जिल्हा प्रशिक्षक अनूप कपूर, प्रवीण फटींग, प्रा. पंकज चोरे, प्रा. नितीन आचार्य, विजय पिंपळकर, वैशाली तडस, उषा तायडे, दशरथ भुजाडे, वंदना कुबडे, ज्योती गांडोळे, किरण ठाकरे, सुनील काळबांडे, सचिन रिठे, समीयोद्दीन पठाण, सुधीर कांबळे, जयश्री जवादे, सुनंदा धावडे, गणेश शेंडे, शुद्धोधन धोंगडे, गोपाल आचार्य, शकील खान, राजकुमारी बावणे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)