चाऱ्यासाठी आता वैरणपेरणीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 10:30 PM2019-04-25T22:30:06+5:302019-04-25T22:30:20+5:30

शासनाचे सोयाबीन हितार्थ धोरण शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडले आणि ज्वारी पीक शेतशिवारातून हद्दपार झाले. आता जनावरांसाठी कड्याळू व चाऱ्याची ज्वारी पेरण्याचा प्रसंग शेतकऱ्यांवर ओढवला आहे.

For the fad nowadays, tomorrow | चाऱ्यासाठी आता वैरणपेरणीकडे कल

चाऱ्यासाठी आता वैरणपेरणीकडे कल

Next
ठळक मुद्देयंत्रामुळे होते भुकटी : ज्वारी पीक शेतशिवारातून हद्दपार

लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.) : शासनाचे सोयाबीन हितार्थ धोरण शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडले आणि ज्वारी पीक शेतशिवारातून हद्दपार झाले. आता जनावरांसाठी कड्याळू व चाऱ्याची ज्वारी पेरण्याचा प्रसंग शेतकऱ्यांवर ओढवला आहे.
विदर्भात नगदी पीक कापूस तर उदरनिर्वाहासाठी ज्वारी, बाजरी, गहू आणि अन्य कडधान्य शेतकरी शेतात पिकवीत होते. कापसाच्या व्यवहारातून घर बांधणे, लग्नप्रसंग आदी कार्यासाठी तरतुदी शेतकरी करीत होते. धान्यातून शेतीव्यवहार आणि खाद्य म्हणून उपयोग प्रत्येक शेतकरी करीत असत.
प्रत्येक शेतकऱ्यांकडे बैलजोडी आणि गायी राहत असत. त्यांच्यासाठी वैरण म्हणून कडबा, कुटार व गव्हाचा गवंडा अशी व्यवस्था असल्याने शेतकरी आनंदाने जीवन जगत होता. शेतीव्यवस्थेतून मानवी जीवनशैली आत्मसात केल्यानेच शेतकरी खऱ्या सुखात नांदत होता.
शासनाने सोयाबीन आणले, बाजाराधीन व्यवस्था निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचा खिसा रिकामा व्हायला लागला.
ज्वारीसोबत जनावरे गेली. यांत्रिक शेती जीवावर बेतणारी ठरू लागली. असे असले तरी बहुतांश शेतकऱ्यांचा कल नवनवीन तंत्रज्ञानाकडे असल्याचेच दिसून येत आहे. सोयाबीन पिकामुळे ज्याप्रमाणे ज्वारीचे पीक मागे पडले, तर यंत्राच्या साहाय्याने पिकांची काढणी केली जात असल्याने गुरांचा चारा मिळेनासा झाला आहे. यंत्राच्या साहाय्याने काढणी करीत असताना केवळ बारीक भुकटी शिल्लक राहते. ते गुरे खाऊ शकत नसल्याने दुसऱ्या चाऱ्याची व्यवस्था करावी लागते.
यावरच पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी सध्या कड्याळू आणि चाऱ्याच्या लागवडीवर भर दिला आहे. बहुतांश शेतामध्ये गुरांच्या चाऱ्यासाठी कड्याळू व चाऱ्याची ज्वारीचे पीक दिसून येत आहे. हा हिरवा चारा गुरांकरिता उपयुक्त असला तरी तो चारण्याचेही तंत्रज्ञान आहे. ते शेतकऱ्यांना आत्मसात करावे लागणार आहे.

Web Title: For the fad nowadays, tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.