२ कोटींच्या लालसेपोटी 'त्याने' ५ लाख दिले, पण हातात आली झेंडूची फुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 04:03 PM2021-11-30T16:03:37+5:302021-11-30T17:10:53+5:30

पाच लाखांचे दोन कोटी ५० लाख बनवून देण्याच्या अमिषाला बळी पडत खेलकर यांनी भोंदूबाबाला पाच लाखांची रक्कम दिली. पण भोंदूबाबाने खेलकर यांची फसवणूक करून पैशांच्या जागी हाती चक्क झेंडूची फुले दिली.

fake baba looted 5 lakh rupees from a man by showing the lure of 2 crore | २ कोटींच्या लालसेपोटी 'त्याने' ५ लाख दिले, पण हातात आली झेंडूची फुले

२ कोटींच्या लालसेपोटी 'त्याने' ५ लाख दिले, पण हातात आली झेंडूची फुले

Next
ठळक मुद्देव्यावसायिकाला गंडाभोंदूबाबावर गुन्हा दाखल

वर्धा : पाच लाखांचे तब्बल दोन कोटी बनवून देण्याचे आमिष देऊन व्यावसायिकाच्या हाती चक्क झेंडूची फुले देण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने थेट देवळी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी भोंदूबाबा तसेच त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तळेगाव (टा.) येथील व्यवसायिक मधुकर खेलकर यांना लक्ष्मण नामक भोंदूबाबाने पाच लाखांचे दोन कोटी ५० लाख बनवून देण्याचे अमिष दिले. त्यावर विश्वास ठेऊन खेलकर यांनी भोंदूबाबाला पाच लाखांची रक्कम दिली. पण भोंदूबाबाने खेलकर यांची फसवणूक करून पैशांच्या जागी हाती चक्क झेंडूची फुले दिली. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खेलकर यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी लक्ष्मण नामक भोंदू बाबा तसेच अशोक चौधरी, ज्ञानेश्वर हिगे, अक्षय हिंगे आणखी एक असे एकूण पाच व्यक्तींविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेतली आहे.

सोयाबीन विकून दिले पाच लाख

फसवणूक झालेल्या खेलकर यांनी सोयाबीन विक्री करून मिळालेली पाच लाखांची रक्कम भोंदूबाबाच्या ताब्यात घेतली होती. पाच लाखाचे थेट दोन कोटी ५० लाख रुपये करतो असे आमिष भाेंदूबाबाने खेलकर यांना दिले होते. पण खेलकर यांच्या हाती धोक्याने झेंडूची फुले देण्यात आली.

हातचलाखी करून केली फसवणूक

भोंदूबाबाने खेलकर यांच्याजवळी पाच लाखांची रक्कम थेट दोन कोटी ५० लाख रुपये बनवतो असे म्हणून एका स्टीलच्या पिंपात टाकले. त्यानंतर पिंपाला कुलूप लावण्यात आले. त्यानंतर हा पिंप खेलकर यांनी घरी नेला. शिवाय भोंदूबाबांनी सांगितल्या प्रमाणेच तो उघडला असता त्यात केवळ झेंडूची फुले होती. एकूणच भोंदूबाबाने हातचलाखी करून खेलकर यांना चक्क पाच लाखांनी गंडा घातला.

तिघांना ठोकल्या बेड्या

सदर प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर या घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या लक्ष्मण नामक भोंदूबाबा तसेच त्याच्या एका साथीदाराचा शोध सध्या देवळी पोलिसांची चमू घेत आहे.

Web Title: fake baba looted 5 lakh rupees from a man by showing the lure of 2 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.