कुटुंब नियोजनात पुरूषांपेक्षा महिलाच अग्रेसर
By Admin | Published: May 10, 2014 12:24 AM2014-05-10T00:24:30+5:302014-05-10T00:24:30+5:30
वाढत्या लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी कुटुंब कल्याण योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राला उद्दिष्ट देणयात आले आहे.
सचिन देवतळे - विरूळ (आकाजी)
वाढत्या लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी कुटुंब कल्याण योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राला उद्दिष्ट देणयात आले आहे. आरोग्य यंत्रणेत कार्यरत सर्व अधिकारी कर्मचारी कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविण्यात वर्षभर व्यस्त राहतात; परंतु अद्यापपर्यंत कुटुंब कल्याण कल्याण शस्त्रक्रियेतसंदर्भात पुरूषामध्ये जनजागृती करण्यात यश आले नसल्याची बाब समोर आली आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत महिलाच अग्रसेर ठरल्या आहे. स्त्री म्हटले की कुटुंबातील महत्त्वाची दोरी आहे. कुटुंबाचा गाढा ओढतांना स्त्रीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. वाढत्या महागाईमुळे कुटुंब नियंत्रणात असणे गरजेचे झाले आहे. यासाठी शासनाकडून कुटुंब कल्याण योजनासुद्धा राबविली जाते. आईपण निभावताना स्त्रीला पाऊलोपावली वेदना सोसाव्या लागतात. बाळंतपण स्त्रीसाठी दुसरे जीवनच असते. त्यातच कुटुंबाचे नियोजनासाठी पुढाकार घेण्याकरिता स्त्रीच अग्रेसर ठरत आहे. स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही पुरूषांमध्ये कुटुंब नियोजनाला घेऊन गंभीरता पाहावयाला मिळत नाही. अलिकडच्या काळात स्त्रीची प्रसुती शस्त्रक्रियेच्या माध्यमातून केली जाते. त्यामुळे स्त्रीयांना ही एक वेदना अतिरिक्त सोसावी लागते. त्यातच कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया ही धारणा आता समाजात मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. पुरूषांनी शस्त्रक्रिया केली तर तो कमजोर होतो, असा चुकीची समज असल्यामुळे पुरूष शस्त्रक्रियेसाठी तयार होत नाही. आपल्या वेदना स्त्रीयांना लादत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाला पुरूषांच्या नसबंदी मध्ये हवे तेवढ्या प्रमाणात यश आले नाही. यात शासनाचे कर्मचारी या प्रकराची माहिती जनजागृती करण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट होत आहे. पुरूष नसबंदी करण्याकरिता नव्याने जननजागृती करण्याची गरज आहे. पुरूषांमध्ये जनजागृती करण्याकरिता प्रबोधानात्मक कार्यक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आले.