शेतीच्या नियोजनाला शेतकरी कंपनीचा हातभार! संघटनात्मक बांधणीतून बियाणे खताचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 12:39 PM2020-06-06T12:39:43+5:302020-06-06T12:40:02+5:30
व्यक्तिगत समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या शेतक?्यांची संघटनात्मक बांधणी करून सामुहिकरित्या शेतीच्या प्रश्नावर उत्तरे शोधण्याचे प्रयत्न केल्यास यश मिळविणे सोयीचे असते. यातून रचनात्मक आणि विकासात्मक यशाला गवसणी देता येते.मात्र यासाठी सामुहिक प्रयत्नाची आणि युवा शेतकऱ्यांच्या पुढाकाराची गरज असल्याचा प्रत्यय समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथे येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: व्यक्तिगत समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या शेतक?्यांची संघटनात्मक बांधणी करून सामुहिकरित्या शेतीच्या प्रश्नावर उत्तरे शोधण्याचे प्रयत्न केल्यास यश मिळविणे सोयीचे असते. यातून रचनात्मक आणि विकासात्मक यशाला गवसणी देता येते.मात्र यासाठी सामुहिक प्रयत्नाची आणि युवा शेतकऱ्यांच्या पुढाकाराची गरज असल्याचा प्रत्यय समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथे येत आहे.
कृषोन्नती या कंपनीच्या संचालकांनी शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता मागणीनुसार शेतीला पूरक वस्तू , साहित्य, अवजारे , सेंद्रिय खते, बियाणे, कामगंध सापळे, फवारणी यंत्र, ताडपत्री, आदी निविष्ठा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यातून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबली आहे. सध्या न नफा ना तोटा या तत्वावर शेतकऱ्यांना विविध निविष्ठा पुरविला जात आहे. वायगाव (हळद्या) या गावातच कंपनीचे कृषि सेवा केंद्र सुरू केले आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या निविष्ठा बाजार भावापेक्षा कमी भावात मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. येथील कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतक?्यांऱ्यांना शेतीविषयक सल्ला मार्गदर्शन केल्या जात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती गावातच उपलब्ध होत असल्याने शेतकरीवर्ग समाधानी आहे.