शेतकरी धडकले तहसीलवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:06 PM2018-11-26T22:06:06+5:302018-11-26T22:08:02+5:30
सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी एकत्र येत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड. सुधीर कोठारी यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. त्यानंतर मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतरण झाले. जाहीर सभेदरम्यान मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी सरकारवर कडाडून टिका केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी एकत्र येत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड. सुधीर कोठारी यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. त्यानंतर मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतरण झाले. जाहीर सभेदरम्यान मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी सरकारवर कडाडून टिका केली.
शेतातील उभ्या पिकांना ओलीत करण्यासाठी कृषीपंपांना दररोज सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विद्युत पुरवठा देण्यात यावा. संपूर्ण वर्धा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, नैसर्गिक आपत्तीच्या काळात उद्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान देण्यात यावे, मागील हंगामात जाहीर केलेल्या गुलाबी बोंडअळीचे अनुदान उर्वरित शेतकºयांच्या बँक खात्या तात्काळ जमा करण्यात यावे. यंदाच्या हंगामातही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सर्वेक्षण करून कपाशी उत्पादकांना शासकीय मदत देण्यात यावी. आधारभूत हमी भाव दराने शासकीय खरेदी केंद्र वर्षभर सुरू ठेवण्यात यावेत, शेतमाल तारण योजनेत सहभागी शेतकऱ्यांना आधारभूत दराचे संरक्षण देण्यात यावे, धाम प्रकल्पाचे पाणी सिचनासाठी सोडण्यात यावे. गामीण भागातील रस्त्यांची दुरूस्ती करून नवीन सिमेंट रस्ते तयार करण्यात यावे. सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी आदी मागण्या मोर्चाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या. मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून तहसील कार्यालय गाठले. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार दीपक करंडे यांनी स्विकारले. जाहीर सभेदरम्यान शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव किशोर माथनकर, जिल्हा अध्यक्ष सुनील राऊत, वर्षा निकम, हिम्मत चतुर, अशोक वादिले, आफताब खान, रमेश भोयर, सुरेंद्र कुकेकार, हरीश वडतकर,पांडुरंग निबालकर, राजु चंदनखेडे, किशोर गाठे, राजू चाफले, डॉ. निर्मेश कोठारी, नरेंद्र थोरात, गंगाधर हिवांज, अरुण बकाल, हेमंत पाहुणे, बबलू सांगळे, गणेश वैरागडे, वामन डभारे, पिंटू सोनवणे, प्रशांत बोरकुटे, दीपक पंधरे, पांडुरंग बादले, जनार्धन हुलके, शालीक वैद्य, रामभाऊ चौधरी, आशीष अंड्रस्कर, शांतीलाल गांधी, चंदू बादले, मधुकर कामडी, मधुकर डंभारे, उत्तम भोयर, हरिष काळे, भूषण पिसे, नगरसेवक धनंजय बकाने, प्रकाश राऊत, विनोद झाडे आदी सहभागी झाले होते.
हे सरकार उद्योगपतींचेच -कोठारी
या सरकारला शेतकऱ्यांची गरज नाही. तो मेला तरी चालेल असेच सद्याच्या केंद्र व राज्य सरकारचे धोरण असल्याचे दिसून येते. केवळ सिमेंट रस्त्याचे भूमिपुजन करून काम सुरू अन् रस्ता बंद अशी या सरकारची अवस्था झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत हे सरकार हद्दपार केल्याशिवाय शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार नाही. या देशात शरद पवार यांच्या रुपाने एकमेव जाणता राजा आहे. त्यांनी ५६ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा दिला होता. याउलट हे सरकार आहे. सध्याच्या सरकारकडून कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांनाच वेठीस धरले जात आहे. विद्यमान सरकारने निवडणुकीच्यावेळी शेतकºयांसह जनतेला विविध आश्वासने दिली होती. याच आश्वासनांच्या जोरावर भाजपा सत्तारुढ झाली. मात्र, सत्ता मिळताच या गोरगरीब व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर उद्योगपदींचे हित जोपासले जात आहे. येत्या निवडणुकीत या सरकारला हद्दपार करण्याचे आवाहन यावेळी शेतकरी नेता अॅड. सुधीर कोठारी यांनी सांगितले.
भाजपा सरकारला घरचा रस्ता दाखवा -निकम
च्या सरकारने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था केली आहे. शेतकºयांना वेठीस धरणाऱ्या सरकारला घरी पाठविणे गरजेचे असून सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत घरचा रस्ता शेतकºयांनीच दाखवावा, असे आवाहन राकाँच्या निरीक्षका वर्षा निकम यांनी केले.