शेतकरी नेते शरद जोशी यांना जयंतीदिनी अभिवादन
By admin | Published: September 5, 2016 12:40 AM2016-09-05T00:40:20+5:302016-09-05T00:40:20+5:30
ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांच्या जयंतीदिनी विविध ठिकाणी शेतकरी मार्गदर्शन मेळावे घेण्यात आले.
वर्धा : ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांच्या जयंतीदिनी विविध ठिकाणी शेतकरी मार्गदर्शन मेळावे घेण्यात आले. शनिवारी विविध संघटनेच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आले.
ममदापूर
वर्धा : देवळी तालुक्यातील ममदापूर येथे शेतकरी संघटनेच्यावतीने शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. प्रास्ताविक प्रभाकर झाडे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते बापू ठाकरे, गिरोली(इंगळे), ज्येष्ठ नेते अॅड. मोहन देशमुख होते. उपस्थितांनी शरद जोशी यांच्या स्मृतींनआ भाषणातून उजाळा दिला. यावेळी प्रकाश कोरेकार, हरिभाऊ डहाके, दिगांबर कोरेकार, बाबाराव धोटे, शेतकरी युवा आघाडीचे कार्यकर्ते व उपसरपंच राजेश इखार, ग्रा.पं. सदस्य प्रियंका डहाके, उमेश तळवेकर, राहुल डहाके, गजानन सिडाम, हेमराज कोरेकार, प्रतिक्षा डहाके, नैना ठोंबरे, महिला आघाडीच्या शारदा झाडे, जीजा डहाके, शोभा कोरेकार, वच्छला राऊत, शांता नैताम, नानी डहाके, उज्वला सावरकर, सुंदरा पुसदेकर, सूर्यभान इखार, पार्वती झाडे, भगवान आत्राम व शेतकरी उपस्थित होते. संचालन कृषक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. मोहन झाडे यांनी तर युगा झाडे यांनी आभार व्यक्त केले.
मुरदगाव (खोसे)
इंझाळा : मुरदगाव(खोसे) येथे शरद जोशी यांच्या प्रतिमेसह गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. यात संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यासह महिला व युवकांनी सहभाग नोंदविला. यानंतर गावातील मंदिरात सभा घेण्यात आली. सभेत माजी आमदार सरोज काशीकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा प्रमुख सतीश दाणी यांनी मार्गदर्शन केले. सभेला सरपंच कोमल रहाटे, उपसरपंच रामाजी पिंपरे, विठ्ठल झाडे, शंकर ठाकरे, विलास हिवरकर, नामदेव ठाकरे, गजानन हिवरकर, विलास झाडे, पुरुषोत्तम झाडे, वासुदेव कुबडे, देवराव बानकर, गंगाधर भोगे, पांडुरंग खडसे, रामभाऊ इंगळे, सुरेश धोटे, शेषराव कोल्हे, बेबी झाडे, रुख्मा झाडे, आशा बानकर, सुमन तेजने उपस्थित होते. संचालन प्रिती धोटे यांनी तर आभार खुशाल हिवरकर यांनी केले.
चिकणी
चिकणी : येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सरोज काशीकर होत्या. उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. शरद जोशी यांचा ‘भीक नको हवे घामाचे दाम’ या एक कलमी कार्यक्रमाचे महत्व विशद केले. कार्यक्रमाचे आयोजन शेख बाबा यांनी केले. आभार सतीश दाणी यांनी मानले. कार्यक्रमाला बबन ढोकणे, शंकर आखुड, राजू होरे, शेख अयुब, प्रभाकर रोंदळे, प्रशांत देशमुख, मनोहर काकडे, अतुल देशमुख, भास्कर काकडे यांनी सहकार्य केले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)