१,१३७ हेक्टरवरील शेतपिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:11 AM2019-01-30T00:11:52+5:302019-01-30T00:12:52+5:30
प्रजासत्ताकदिनाच्या पूर्व संध्येला जिल्ह्याला वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. शिवाय जिल्ह्यातील काही भागात गारपीटही झाल्याने शेतकºयांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्रजासत्ताकदिनाच्या पूर्व संध्येला जिल्ह्याला वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. शिवाय जिल्ह्यातील काही भागात गारपीटही झाल्याने शेतकºयांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शुक्रवार २५ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटामुळे एकूण १ हजार १३७ हेक्टरवरील गहू, हरभरा, भाजीपाला वर्गीय तसेच इतर पिकांचे नुकसान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
यंदाच्यावर्षी खरीप हंगामात सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने अनेक शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. त्यानंतर झालेल्या समाधानकारक पावसानंतर पेरणीच्या कामाला शेतकºयांनी गती दिली होती. वेळोवेळी योग्य निगा घेतल्याने तूर, कपाशी आदी पीकही बºयापैकी बहरले. सध्यास्थितीत कोरडवाहू शेतजमीनीवरील कपाशीची उलंगवाडी झाली असली तरी ओलिताच्या शेतात अद्यापही कपाशीचे पीक कायम आहे.
शुक्रवार २५ जानेवारीला झालेल्या अवकाळी पावसामुळे कपाशीच्या झाडाची फुटलेली बोंड भिजल्या गेल्याने कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. इतकेच नव्हे तर काही भागात गारपीट झाल्याने याचा चांगलाच फटका गहू व हरभरा या रबी पिकांनाही बसला आहे. तर संत्रा या पिकाचे गारपीटामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकरी सांगतात. वादळीवाऱ्यासह पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील शेतात उभे असलेल्या हरभरा आणि गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सर्वेक्षण करून झालेल्या नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर केला आहे. त्यात एकूण १ हजार १३७ हेक्टर शेतजमिनीवरील गहू, हरभरा, भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान झाल्याचे नमुद आहे. तर महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात सेलू तालुक्यातील तीन गोठ्यांचे आणि एका घराचे अंशत: नुकसान झाल्याचे आणि आर्वी तालुक्यातील एका घराचे पूर्णत: नुकसान झाल्याचे नमुद करण्यात आले आहे. सदर नुकसानग्रस्तांना शासकीय मदत मिळावी, अशी अपेक्षा आहे.
शेतपिकांचे वर्धा तालुक्यात सर्वाधिक नुकसान
शुक्रवार २५ जानेवारीला झालेल्या वादळीवाऱ्यासह पाऊस आणि गारपीटामुळे वर्धा तालुक्यातील शेतपिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. वर्धा तालुक्यातील १६३ हेक्टर, सेलू तालुक्यातील ३७१ हेक्टर, देवळी तालुक्यातील २८५ हेक्टर तर आर्वी तालुक्यातील २१८.३० हेक्टर शेतजमिनीवरील गहू, हरभरा, भाजीपाला व इतर पिकांचे ३३ टक्केच्या आत आणि वर्धा तालुक्यातील ६५ हेक्टर व सेलू तालुक्यातील ३५ हेक्टर वरील शेतपिकांचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अभिप्राय जिल्हा प्रशासनाला कृषी विभागाने सादर केला आहे.