सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:15 AM2017-08-15T00:15:01+5:302017-08-15T00:20:36+5:30

शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करावा या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी सुकाणू समितीच्या नेतृत्त्वात सोमवारी राज्यभर आंदोलन पुकारण्यात आले.

Farmers aggressive for overall debt relief | सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक

सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाभर आंदोलन : ठिकठिकाणी रस्तारोको

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करावा या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी सुकाणू समितीच्या नेतृत्त्वात सोमवारी राज्यभर आंदोलन पुकारण्यात आले. यात वर्धेतील शेतकरीही सहभागी झाले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलने करून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला. वर्धा शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आले.
जिल्ह्यातील संतप्त शेतकºयांनी रस्ता रोको करून शासनाच्या कर्जमाफीचा निषेध नोंदविला. वर्धेत हिंगणघाट मार्गावर भूगाव लगत शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. जिल्ह्यात पुलगाव, वर्धा, जाम चौरस्ता आणि पोहणा येथे रस्ता रोको करण्यात आला. तर वर्धेसह आर्वी येथील शिवाजी चौक परिसरात धरणे देण्यात आले. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलनामुळे दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. समुद्रपूर येथे शेतकरी बैलबंडी घेूवन रस्त्यावर उतरल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
या आंदोलनात सहभागी असलेल्यांवर पोलिसांच्यावतीने गुन्हे दाखल करण्यात आले. वर्धा-हिंगणघाट मार्गावर आंदोलन करणाºया प्रहारच्या ११ जणांवर सावंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय जिल्ह्यात इतर ठिकाणी आंदोलन करणाºयांना स्थानबद्ध करण्यात आले.

संपूर्ण कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील रस्त्यांवर ‘जाम’
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी तथा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश रस्ते एक ते दीड तास ‘जाम’ झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलीस यंत्रणेने आंदोलकांना ताब्यात घेत रस्ता मोकळा केला.
विकास चौक
सेलू/घोराड - संपूर्ण कर्जमाफी व स्वामिनाथन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी प्रहार व किसान अधिकार अभियानने सोमवारी सकाळी १० वाजता विकास चौकात रस्ता रोखून धरला. सकाळपासूनच शेतकरी बैलबंडीसह एकत्रित आले. यात २० ते २५ बैलबंडीचा समावेश होता. शेकडो शेतकºयांनी वर्धा-नागपूर महामार्ग अर्धा तास बंद पाडला. यामुळे वाहनांच्या दोन किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. प्रहार, किसान अधिकार अभियान व शेतकºयांनी शासनाविरूद्ध नारेबाजी केली. यात मिलिंद गोमासे, विठ्ठल झाडे, विवेक धोंगडे आदी शेतकºयांचा सहभाग होता. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. काही अतिउत्साही पोलिसांनी शेतकºयांना शिवीगाळ केल्याने आंदोलन चिघळण्याची स्थिती उद्भवली होती; पण ठाणेदार बोठे यांनी समयसुचकता दाखवित आंदोलकांना शांत केले.
वायगाव चौरस्ता
वायगाव (नि ) - प्रहार व युवक काँगे्रसने सकाळी १०.३० वाजता येथील चौरस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले. सकाळीच शेतकरी चौकात एकत्र झाले. शेतकºयांनी वर्धा, राळेगाव, हिंगणघाट, देवळी मार्गावरील वाहतूक बंद पाडली. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रहार, युवक कॉग्रेस व शेतकºयांनी नारेबाजी करीत शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला. यात सुधीर पोहनकर, आशीष शिंदे, पिंटू नगराळे, विट्ठल गैरवार, सुरेंद्र निमजे, अतुल वाटगुळे, प्रवीण साठोणे, विलास मस्कर, अतुल कोहार, पप्पू पांडे, विशाल गेडाम, पियूष भोयर, गोलू शिंदे, गजू ढोबळे सराठे, काटकर आदी सहभागी झाले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
जाम चौरस्ता
समुद्रपूर - राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर प्रहारने सकाळी ११ ते ११.३० पर्यंत अर्धा तास रस्ता रोको आंदोलन केले. तेवढ्या वेळेत हिंगणघाट, हैद्राबाद, चंद्रपूर, उमरेड, समुद्रपूर रोड बंद पडला. परिणामी, वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. गजू कुबडे, देवा धोटे, अंकित दांडेकर, रमेश बोभाटे, महेश धुमडे, जयंत तिजारे, अजय लढी, छोटू डगवार, दिवाकर घंगारे यासह प्रहारचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. अप्पर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, ठाणेदार प्रवीण मुंडे, गायकवाड, वाटकर, घुसे व पोलीस कर्मचाºयांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
आर्वीत रस्ता रोको तर आष्टी, कारंजाला निवेदन
आर्वी- प्रहार सोशल फोरमने शिवाजी चौकात रस्ता रोको आंदोलन केले. एक तास वाहतूक रोखण्यात आली. आर्वी-पुलगाव व देऊरवाडा मार्गावरील वाहतूक ठप्प होती. पोलिसांनी बाळा जगताप व २५० कार्यकर्त्यांना अटक करीत रस्ता मोकळा केला. यावेळी एसडीओंना निवेदन दिले तर आष्टी व कारंजा येथेही तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

प्रहारकडून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
प्रहार संघटनेच्यावतीने भुगाव टी-पॉर्इंट परिसरात रस्तारोको आंदोलन करून राज्य सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. जवळपास २० मिनीट चाललेल्या रस्तारोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दोहोबाजुंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या आंदोलनात प्रहारचे शहर प्रमुख विकास दांडगे, राजू लढी, स्रेहल खोडे, प्रशील धांदे, रोशन दाभाडे, श्याम शेलार, भूषण येलेकर, नावेद बेग, नितीन काटकर, अरविंद मसराम, आदित्य कोकडवार, सागर हिवरे आदि सहभागी होते.

Web Title: Farmers aggressive for overall debt relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.